Pune Porsche Accident: दोघांना चिरडलं.. 'त्या' मुलाला पाच कोटीची कार देणारी 'ती' व्यक्ती कोण?
Pune Accident: पुण्यात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला. याप्रकरणी आरोपी मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या ते नेमके कोण...
ADVERTISEMENT

Vishal Agarwal Pune Porsche Accident: पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी (18 मे) मध्यरात्री एका आलिशान पोर्शे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरुणी काही फूट वर उडून जमिनीवर आपटली, तर तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरपटत गेला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी दारुच्या नशेत गाडी चालवत असल्याचा दावा यावेळी अनेकांनी केला. (pune porsche accident who is the father of the young man who crushed the two with a 5 crore porsche car vishal agarwal)
महत्वाचं म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला 15 तासातच जामीन मंजूर झाला. हा आरोपी बड्या उद्योजकाचा मुलगा असल्याचं समोर आलं. आरोपी चालवत असलेली पोर्शे कार जवळजवळ 5 कोटींची होती. 17 वर्षाच्या या मुलाला 5 कोटींची पोर्शे कार चालवायला देणारे त्याचे वडील कोण, त्यांची पुण्यात ओळख काय? हे सगळे प्रश्न या नंतर आपोआप चर्चेत आले, याचविषयी आपण जाणून घेऊया
कोण आहेत विशाल अग्रवाल...
पुण्यातल्या या हायव्होल्टेज अपघातानंतर आरोपीला अटक तर झाली पण पोलिसांनी 15 तासांच्या आत आश्चर्यकारक अटींवर त्याला जामीन मंजूर केला. त्याला या प्रकरणावर निबंध लिहण्याची आणि 15 दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं आणि नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला.
पोलीस चौकशी दरम्यान या आरोपीनं देखील कबुली दिली. 'मी कार चालविण्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार मला दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्याची परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे.' असं या अल्पवयीन आरोपीने पोलीस जबाबात सांगितलं.