'ऑपरेशन हनीमून'अंतर्गत पोलिसांनी उघडली अनेक गुपितं, सोनमची अख्खी कुंडलीच काढली
raja raguwanshi murder case : मेघालयातील शिलॉंग येथे राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. या घटनेत पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. या प्रकरणाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असे नाव दिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्येची देशभरत चर्चा

पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले
Raja raguwanshi Murder case : मेघालयातील शिलॉंग येथे राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. या घटनेत पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. या प्रकरणाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असे नाव दिले आहे.
हेही वाचा : आजीने बँकेतून 90 हजार रुपये काढले, नातवाने थेट तोंडात बोळा कोंबून... नांदेड हादरलं
राजा रघुवंशीच्या हत्येमागील मोठं गुपीत
दरम्यान, या घटनेची एकूण माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचं पथक नेमण्यात आलं होतं. या पथकात 20 सदस्यांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणात एकूण 120 पोलिसांनी लक्ष्य घालत घटनेतील गुपीत बाहेर काढण्याचे काम केलंय. आतापर्यंत एकूण तपासातून ज्या गोष्टी समोर आल्याने या घटनेत मोठा ट्विस्ट निर्माण होणार आहे.
हा कट नियोजनपूर्व आणि विचारपूर्वक रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी 7 जून रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणी छापे टाकलेत. दरम्यान, या छाप्यात आरोपींची तपासणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज समोर आल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला. सोनम सीसीटीव्हीत इतर तिघांसोबत दिसत होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच आरोपींना राजा रघुवंशीची हत्या करण्याचा इशारा दिला होता. संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा 21 मे रोजी गुवाहाटी येथे पोहोचले असता, ते 22 मे रोजी सोनमच्या मागे शिलॉंगला गेले आणि 23 मे रोजी घटनास्थळी दाखल झाले.