बलात्काराच्या गुन्ह्यात 'तो' जेलमध्ये गेला..जामीनावर बाहेर येताच तरुणीवर झाडल्या गोळ्या, नंतर घडलं सर्वात भयंकर!

मुंबई तक

Today Shocking Viral News :  दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला गोळी मारून तिची हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

Ambajogai Rape Case Latest Update
Ambajogai Rape Case Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जामीनावर बाहेर आल्यावर आरोपीने पीडित तरुणीला मारली गोळी

point

पीडित तरुणीने आरोपीवर बलात्काराचा आरोप केला होता

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Today Shocking Viral News :  दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला गोळी मारून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. अजुबैर सफी आणि अमन सुखला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, रेप पीडित महिलेच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या महिलेला गोळी मारण्यात आली, ती एका सलूनमध्ये हेड मॅनेजर म्हणून काम करते. पोलिसांनी म्हटलंय की, ही धक्कादायक घटना बुधवारी घडली. बुधवारी दोन लोक दुचाकीवरून प्रवास करत होते, त्यावेळी त्यांनी महिलेवर फायरिंग केली.
महिलेनं बलात्काराची तक्रार दाखल केली.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होणार... 'ही' खास ट्रेन लवकरच धावणार

आरोपी अजुबैर सफी ज्याने महिलेला गोळी मारली होती. त्याच्या विरोधात महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी रेप केसमध्ये जामीनावर सुटला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने महिलेवर गोळी झाडली. महिलेच्या जबाबाच्या आधारावर वसंत विहार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांच्या तपासात आरोपी अजुबैर सफीने म्हटलंय की, महिलेनं त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो नाराज होता. त्याने सतत महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने महिलेला गोळी मारली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp