Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती

योगेश पांडे

ADVERTISEMENT

sana khan murder case amit sahu run sextortion racket throgh blackmail people extort money
sana khan murder case amit sahu run sextortion racket throgh blackmail people extort money
social share
google news

Sana Khan Murder Case : भाजप पदाधिकारी सना खान (sana khan)  हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी अमित साहूला (Amit Sahu) अटक झाल्यापासून हळुहळू या घटनेचा उलगडा होत चालला आहे. आता या प्रकरणात सेक्स्टॉर्शनचा अँगल समोर आला आहे. आरोपी अमित साहू हे सना खानच्या माध्यमातून सेक्स्टॉर्शन करून खंडणी उकळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अमित साहूच्या एका साथिदाराला अटक झाल्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे. (sana khan murder case amit sahu run sextortion racket throgh blackmail people extort money)

सना खान हत्या प्रकरणात सुरूवातीला पैशांच्या वादातून अमित साहूने तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र आता या प्रकरणात पोलीस तपासात नवीनच खुलासा झाला आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सना खानची फेसबुकद्वारे अमित साहूशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले होते. या लग्नानंतर अमित साहूचे जबलपूर आणि नागपूर येथे राहणाऱ्या त्याच्या साथीदारांनी सना खानवर दबाव टाकायला सुरुवात केली होती. तिला मानसिक त्रासही दिला होता. इतकंच नव्हे तर तिला जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती.

हे ही वाचा : loco pilot suicide : … आणि लोको पायलटने आयुष्यच संपवलं, कल्याणमधील घटना

सेक्सटॉर्शन रॅकेट चालवायचे

अमित साहू आणि साथिदारांच्या त्रासामुळे सना खान दबावात होती. या दबावातून अमित साहू आणि त्याचे साथिदार सना खानला ओळखीच्या लोकांकडे पाठवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडायचे. आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि फोटो बनवून अमित साहू आणि त्याचे साथिदार त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी उकळायचे. सेक्स्टॉर्शन साऱख्या गुन्ह्यात ज्याप्रमाणे नागरीकांकडून ब्लॅकमेल करून खंडणी उकळली जातात, तसाच हा संपूर्ण प्रकार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान आरोपी अमित साहू आणि त्याच्या जबलपुर व नागपुरच्या साथिदारांनी अश्लील व्हिडीओ व फोटोच्या माध्यमातून अनेक लोकांकडून लाखो रूपयांची खंडणी वसूल केली आहे. आरोपींनी या प्रकरणात अद्याप किती लोकांना ब्लॅकमेल करून फसवले आहे, याची माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही आहे. यासोबत खंडणीला बळी पडलेल्या नागरीकांनी देखील पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलीस आता आरोपींच्या मोबाईलमधील फोटोंच्या माध्यमातून नागरीकांचा शोध घेऊन त्याची तपास करणार आहे. त्यांनंतर हे संपूर्ण सेक्स्टॉर्शनचं आहे की नाही याचा खुलासा होणार आहे.

हे ही वाचा : Crime: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, तरूणाने स्क्रू डायव्हरने…लिव्ह इन पार्टनरसोबत भयंकर कृत्य

पोलिसांनी अमित साहूला याआधी अटक केली आहेच, आता या प्रकरणात त्याच्या एका साथिदाराला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी अमित साहू आणि त्याच्या साथिदाराविरूद्ध भादंवि सह कलम 66 (ई), 67, 67 (अ) आय.टी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT