Satara : पती-पत्नी रात्री शेतात गेले अन् दोघांचे रक्तबंबाळ मृतदेहच सापडले
माण तालुक्यातील आंधळी गावात पती-पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीने धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
ADVERTISEMENT
-इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
Satara Crime News : पती-पत्नी पिकाला पाणी देण्यासाठी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेतात गेले. पण, त्यानंतर त्यांचे मृतदेहच शेतात आढळून आले. दोघांची हत्या करण्यात आल्याचे समोर आलं असून, धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दोघांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (couple murder by unknown people in satara)
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. आंधळी (ता.माण) येथील पवारदरा या ठिकाणी मध्यरात्री पती पत्नी पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून खून केला. हत्येचे कारण अद्याप समजले नसून, शस्त्र घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Israel Palestine : धर्म अन् भूमी… इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्षाची कहाणी काय?
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संजय रामचंद्र पवार (वय 50) व मनीषा संजय पवार (वय 45) हे दोघे रात्री दहा नंतर पवारदरा येथील शेतात भिजवण्यासाठी गेले होते. पिकाला पाणी देण्यासाठी पाईप जोडत असताना रात्री अचानक अज्ञाताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.
हेही वाचा >> ‘…हे घटनात्मक पाप आहे’, पवार गटाचा राहुल नार्वेकरांवर मोठा आरोप
दोघांच्या डोक्यात आणि मानेवर हल्ला करण्यात आला. जबरी घावामुळे ते जागीच ठार झाले. सकाळी 9:30 वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT