दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट, महाबळेश्वरमध्ये घडला अनर्थ

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

satara district mahabaleshwar 8 boys and girls injured due to generator explosion during durgadevi procession mirvnuk
satara district mahabaleshwar 8 boys and girls injured due to generator explosion during durgadevi procession mirvnuk
social share
google news

Satara Accident : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) दुर्गादेवी मिरवणूक (Durgadevi mirvnuk) चालू असताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या पाईपचा स्फोट (Generator burst) होऊन भीषण स्फोट झाला. जनरेटरच्या या स्फोटात 8 मुले-मुली भाजून गंभीर (8 boys-girls burnt) जखमी झाली आहेत. जखमी मुला-मुलींना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

अचानक जनरेटरने घेतला पेट

महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील दुर्गा माता मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक कोळी आळीमध्ये दिलीप रिंगे यांच्या घरासमोर आली असताना जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागून जनरेटरने पेट घेतला. यावेळी दुर्गादेवीच्या मूर्तिजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील 7-8 मुलं भाजून गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Dasara Melava 2023: ‘त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही…’, CM शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका

कपड्यांमुळे बालकं जखमी

मुलांच्या अंगावरील सर्व कपडे जळाली असून त्यातील जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुख्यमंत्र्यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची घेतली शपथ, नेमकं प्रकरणं काय?

अधिकाऱ्यांचीही धावाधाव

सध्या सर्व जखमी मुलांना सातारा येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपाचर सुरु आहेत. माझी नगरसेवक संतोष आबा शिंदे यांनीही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनीही या घटनेची माहिती घेऊन डॉक्टरांबरोबर संवाद साधला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT