Sharad Mohol : घरात जेवले, अंगणात काढला काटा… रक्षक बनून घेतला बदला
पुण्यातील गँगवॉर शरद मोहोळच्या हत्येनं पुन्हा एकदा चर्चेत आलं ते वेगळ्याच कारणामुळे. कारण शरद मोहोळचा ज्या लोकांनी काटा काढला ते त्याचेच साथीदार होते, आणि त्याचा काटा काढतानाही त्यांनी त्याच्या लग्नाचाच वाढदिवस दिवस निवडला होता आणि त्याला भररस्त्यात गोळ्या घातला व त्याचा काटा काढला.
ADVERTISEMENT
Sharad Mohol: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्याच साथीदारांनी कोथरूड (Kotharud) भागात भररस्त्यात गोळ्या घालून हत्या केली. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पुण्यासह परिसरात जोरदार खळबळ उडाली होती. मात्र ही हत्या करण्यासाठी त्याच्याच साथीदारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आखणी केली होती. शरद मोहोळची हत्या (Murder) करण्यासाठीही मारेकऱ्यांनी दिवस निवडताना त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचाच दिवस निवडला. ज्यांनी शरद मोहोळच्या घरात त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर एकत्र जेवणही केले होते. त्याच लोकांनी तो घरातून बाहेर पडताच भररस्त्यात त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर शरद मोहोळच्या हत्येचा थरारक व्हिडीओ समोल आला आणि हत्या नेमकी कशी झाले ते समोर आली.
ADVERTISEMENT
घराजवळच घातल्या गोळ्या
शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पोलिसांनीही तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला मात्र काही तासांनी हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले जोरदार खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शरद मोहोळ साथीदारांसोबत एका गल्लीतून चालताना दिसत आहे. जे त्या फुटेजमध्ये दिसत आहेत ते म्हणजे विठ्ठल गांडले, नितिन कानगुडे आणि साहील पोळेकर चालत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्याच्या घरापासून काही अंतरावर गेला असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखलही करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा >> ‘बाप हा बाप असतो…’, आव्हाडांनी अजित पवारांना ठणकावून सांगितले
एकत्रच राहूनच घात केला
शरदच्या साथीदारांनी त्याला गोळ्या झाडण्याआधी त्याचा त्यांनी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी एकत्र जेवणही केले होते. शरद मोहोळच्या घरात जेवण करुन झाल्यानंतर ते सगळे एकत्रच बाहेर पडले होते. मात्र काही अंतरावर गेल्यावर मात्र त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. साथीदारांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्याच्या मानेत घुसल्या तर एक छातीत आणि एक त्याच्या डोक्यात घुसली होती. तो कोसळताच मात्र त्या सगळ्यांनी तिथून पळ काढला.
हे वाचलं का?
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
शरद मोहोळवर गोळ्या झाडल्याची बातमी वाऱ्यासारखी पुण्यासह परिसरात पसरली आणि त्या घटनेचा अनेकांना धक्का बसला. गोळ्या झाडल्यानंतर आरोपीनीही सुतारदरा भागातून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेण्यास चालू केले. त्यावेळी वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून पोलिसांनीही आरोपींच्या काही काळातच मुसक्या आवळल्या.
हे ही वाचा >> मुंबईत घातपात घडवण्याचा कट; बोरिवलीतून 6 जणांना अटक, ‘हे’ आरोपी आहेत तरी कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT