लोहगड हत्या केस: चेतनसाठी 'तो' होता इशारा.. सिया खाली वाकली अन् केतनचा खेळ खल्लास!

निलेश झालटे

केतन अग्रवालला लोहगडवर नेऊन मारण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी एक इशारा ठरवला होता. तो नेमका काय होता हे आता पोलीस तपासातून पुढं आलं आहे.

ADVERTISEMENT

shocking revelations in ketan agrawal murder case prior reconnaissance at lohagad rehearsal for murder in rajasthan find out signal accused had decided upon for killing
लोहगड हत्या केस
google news

पुणे: देशभरात चर्चेत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याची हत्या ही क्षणिक रागातून नव्हे, तर अत्यंत थंड डोक्याने आखलेल्या कटाचा भाग होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी हत्येपूर्वी अनेक दिवस नियोजन केले होते. इतकेच नव्हे, तर गुन्हा यशस्वी करण्यासाठी त्यांनी रेकी, रिहर्सल आणि स्वतःची ओळख लपवण्याचीही संपूर्ण तयारी केली होती.

लग्न नको म्हणून रचला हत्येचा कट

पोलीस तपासानुसार, सिया गोयल हिचे केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरले होते. मात्र, तिला हे लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. 18 जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले आणि तेथून त्याला खोल दरीत ढकलण्यात आले. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.

हे ही वाचा>> केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि चेतनने गुगलवर जे शोधलं ते ऐकून हादरून जाल

सियाच्या एका इशाऱ्यावर चेतनने दिला धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्येसाठी एक ठरावीक संकेत निश्चित केला होता. लोहगडावर पोहोचल्यानंतर सिया पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसणार, हा चेतनसाठी हल्ल्याचा इशारा होता. सिया खाली बसताच चेतनने पाठीमागून येत केतनला खोल दरीत ढकलले.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सियाची युक्ती

पोलिसांच्या मते, सिया खाली बसण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होते. केतनला धक्का दिल्यानंतर तो स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात सियाचा हात पकडू शकला असता. तसे झाल्यास सियाही त्याच्यासोबत दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठीच ती केतनपासून काही अंतरावर खाली बसली होती.

हे वाचलं का?