आईची दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या, सोलापूर शहर हादरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Solapur Suicide Case
Solapur Suicide Case
social share
google news

Solapur Suicide: सोलापूर शहरासह जिल्हा एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आई (mother) आणि दोन मुलांनी (son-daughter suicide) गळफास घेऊन आत्महतया केल्यामुळे शहर हादरलं आहे. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. 

सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये हे कुटुंब राहते. कामावर गेलेल्या पतीने पुन्हा घरी फोन केल्यानंतर घरी कोणीच फोन उचलला नाही. त्यामुळे ते घरी पाहायला गेल्यावर तिघेही लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. त्यानंतर चिल्लाळ यांच्या शेजारी राहणारे अनेक लोक जमा झाले, त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

हे ही वाचा >> Ketaki Chitale ला पुन्हा अटक होणार? वादग्रस्त विधान काय? 

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, स्नेहा संतोष चिल्लाळ (वय 30), संध्या संतोष चिल्लाळ (वय 11), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय 7) असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ लटकलेले मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्नेहा चिल्लाळ यांच्यासह त्यांच्या मुलांना साडीने गळफास घेऊन आत्महत्या का केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत. माध्यमांशी बोलताना आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने सांगितले की, घरात कोणताही वाद नव्हता, आज ते कामासाठी घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर बाजार देण्यासाठी त्यांनी पुन्हा घरी फोन लावला त्यावेळी मात्र फोन कोणीच उचलला नाही. त्यामुळे स्वतः पतीने घरी जाऊन पाहिल्यावर त्यांना घडलेला प्रकार दिसून आला.


घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला. या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साह्याने तिघांनी गळफास घेतल्याचे पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्यांना बोलवून हे तीनही मृतदेह खाली उतरवले.सदरचे मृतदेह सिविल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nagpur : अश्लील फोटो, सेक्शटॉर्शन आणि लव्ह... फोटोग्राफरच्या हत्येची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT