Ketaki Chitale ला पुन्हा अटक होणार? वादग्रस्त विधान काय?
Beed News : ॲट्रॉसिटी कायद्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Beed News : ॲट्रॉसिटी कायद्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने अनुसूचित जाती आणि जमातीचे कवच कुंडल असणाऱ्या ॲट्रॉसिटी (atrocity) कायद्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आंबेडकरी समाजाच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर पोलिसांना केतकी चितेळेवर गुन्हा दाखल करावा लागला आहे. (A case has finally been filed against Ketaki Chitale who made statements about atrocity)
ADVERTISEMENT
परळीतील शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर चार दिवसानंतर वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी आणि केतकी चितळेच्या विरोधात कलम 295 (अ) तसंच कलम 505 (2) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲट्रॉसिटीवर केतकी चितळे नेमकं काय म्हणाली?
माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती. या परिषदेत बोलताना मानसिक विकृत असणाऱ्या व महापुरुषांबद्दल नेहमीच आक्षेपार्ह बोलणाऱ्याअभिनेत्री केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी हा पैसे कमावण्याचा साईड बिझनेस आहे. ॲट्रॉसिटीचे रॅकेट आहे. खोट्या ॲट्रॉसिटी दाखल केल्या जातात अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून तमाम अनुसूचित जाती जमातीचा अपमान केला. तसंच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा तिने प्रयत्न केला होता.
हे वाचलं का?
याबरोबरच मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना येड्याची जत्रा म्हणून तिने संबोधलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
अखेर 29 फेब्रुवारी रोजी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी आणि बेताल वक्तव्य करणारी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव धर्माधिकारी हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असून परळी शहर अजित पवार गटाचे विद्यमान शहर अध्यक्ष आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT