Crime : आईचं शिर धडापासून केलं वेगळं, मुंडकं घेऊन मुलगा फिरला गावभर, कारण…

भागवत हिरेकर

Son killed mother : जमिनीचा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलाने कुऱ्हाडीने आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर मुंडक घेऊन गावभर फिरला.

ADVERTISEMENT

son slit mother's throat horrifying incident in uttar pradesh.
son slit mother's throat horrifying incident in uttar pradesh.
google news

Latest Crime News in Marathi : ज्या मायमाऊलीने जन्म दिला. जीवापाड जपले आणि मोठं केलं. तो मुलगा तिच्यासाठी यम ठरला. आधी आईचा गळा कापला. जन्मदात्रीचे शिर धडापासून वेगळं केलं. नंतर मुंडक घेऊन गावभर फिरला. पोलीस आल्याचे कळताच जाऊन शेतात लपला. थरकाप उडवणारी ही घटना ऐकून पोलिसही सुन्न झाले.

ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये. 40 गुंठे जमिनीसाठी मुलाने आईचा शिरच्छेद केला. यानंतर आरोपीने डोके घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण गाव हादरले. लोकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो आईचे डोके धरून शेतात बसलेला आढळून आला.

हेही वाचा >> इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले

मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर येथील ताळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर येथे आरोपी दिनेश पासी याची आई कमला देवी यांच्या नावावर 6 बिघा जमीन (तीन एकर) होती. कमला यांचा मुलगा दिनेश याला ही जमीन आपल्या नावावर करायची होती. तर दिनेशची आई कमला 6 बिघ्यांपैकी फक्त 2 बिघा (४० गुंठे) जमीन मागत होती. याचा राग कमला यांचा मुलगा दिनेश याच्या मनात होता.

कुऱ्हाडीने कापला गळा, मुंडक घेऊन गावात फिरला अन् नंतर…

एक एकर जमीन मागितल्याचा दिनेशला इतका राग आला की त्याने आईची हत्या केली. नशेतच तो घरी आला होता. यानंतर त्याने आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला. याचवेळी दिनेशने घरातील कुऱ्हाड उचलून आई कमला देवी यांचा शिरच्छेद केला. यानंतर तो आईचे मुंडक घेऊन गावात गेला.

हे वाचलं का?