Amravati Crime: सासू, बायकोच्या भावाला जिवंत जाळलं; जावयाने का केलं सैतानी कृत्य?
अमरावती जिल्ह्याच्या वरूड तहसील बेनोडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास एका घराला आग लागली होती. या दरम्यान घरात तीन जणांचा मृतदेह जळाल्या अवस्थेत सापडला होता.यावेळी पोलिसांनी तत्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
Amravati Crime :अमरावती (Amravati) जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका जावयानेच सासूला आणि भावाला जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी जावयाने (son in law) स्वत:ला देखील जिवंत जाळून आत्महत्या केलीआहे.रात्री 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरात आग लागल्याचे कळताच ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी (Police) घरातील तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.(son in law killed mother in law and brother burn amravati crime story)
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्याच्या वरूड तहसील बेनोडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास एका घराला आग लागली होती. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होतं आगीवर नियंत्रण आणले होते. या दरम्यान घरात तीन जणांचा मृतदेह जळाल्या अवस्थेत सापडला होता.यावेळी पोलिसांनी तत्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
हे ही वाचा : ‘नव्या संसदेतील ‘ते’ विधेयक फक्त जुमलाच’, सुप्रिया सुळेंनी सरकारला फटकारले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत आरोपी आशिष ठाकरे याचे काहीच महिन्यापूर्वी लता भोंडे यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. या विवाहाच्या दोनच महिन्यानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडायला सूरूवात झाली होती. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. आशिष ठाकरे यांनी बायकोला माहेरी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.मात्र जावई आशिष ठाकरे दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने सासू आणि भावाने याला विरोध केला. आशिष ठाकरे याने दोन ते तीन वेळा सासू आणि भावाला बायकोला माहेरी पाठवण्याची मागणी केली होती, तसेच सासरच्यांना धमकावले देखील होते. मात्र बायकोच्या भावाने या धमकीला न घाबरता त्याला काहीच उत्तर दिले नव्हते.
हे वाचलं का?
यामुळे रागावलेल्या आरोपी आशिष ठाकरे याने बाईक घेऊन सासर गाठलं आणि सासू आणि भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. यानंतर स्वत:वर देखील पेट्रोल ओतून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सासू आणि भावाच्या हत्येनंतर आरोपीने या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर त्याने आत्महत्या केली होती.सुदैवाने या घटने दरम्यान आरोपी आशिष ठाकरे याची बायको तिच्या सासरी नव्हती.ती तिच्या मावशीच्या घरी गेली होती. त्यामुळे ती या घटनेत बचावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आता हत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न असे दोन्ही गुन्हे दाखल केले आहेत. तसेच तीनही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.तसेच मृत आरोपीने दोघांची हत्या कशी केली, याचा तपास आता पोलीस करतायत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT