Crime: ‘मुलगा अशुभ होता, म्हणून…’, एका वर्षाच्या चिमुकल्याचा गळा घोटला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

son was unlucky father killed 13 months child confesssion on court jhalawar rajasthan crime story
son was unlucky father killed 13 months child confesssion on court jhalawar rajasthan crime story
social share
google news

राजस्थानच्या (Rajasthan) झालावा़डमधून (Jhalawar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच 13 महिन्याच्या बाळाची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. अब्बास अली बोहरा असे या आरोपी बापाचे नाव आहे.बाळाच्या हत्येनंतर तो फरार आहे. पोलीस आता या आरोपी बापाचा शोध घेत आहेत. (son was unlucky father killed 13 months child confesssion on court jhalawar rajasthan crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अब्बास अली बोहरा हा मुळचा मध्यप्रदेशच्या नीचमचा रहिवासी आहे.तर गेल्या काही वर्षापासून तो झालावाडमधील पुराना बस स्टँड खानापूर परिसरात राहत होता. सोमवारी दुपारीने त्याने आपल्या 13 महिन्याच्या बाळाची घरातच गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर आरोपी बाप घटनास्थळावरून फरार झाला होता.या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.त्यानुसार पोलिसांनी तपास करून कोटाच्या ग्रामीण परिसरातून आरोपी अब्बास अलीला अटक केली. या अटकेनंतर आता पोलिसांकडून आरोपी बापाची चौकशी केली जात आहे. या चौकशीत आरोपी बापाने हत्येमागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे.

हे ही वाचा : मुंबई Tak Impact: गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट, थेट 7 पोलिसांवर ‘ही’ कारवाई

हत्येचा रचला कट

आरोपी अब्बास बोहराने आपल्या 13 महिन्याच्या बाळाची हत्या करण्यासाठी कट रचला होता. या कटानुसार, हत्येच्या दिवशी मस्जिदमध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी पत्नी यास्मीन आणि त्याचा मोठा मुलगा मस्जिदमध्ये गेले होते. यावेळी आरोपी पिता अब्बास आजारपणाच कारण सांगून घरीच थांबला होता. यावेळी पिता अब्बास बोहरा आणि 13 महिन्याचा मुलगा घरीच होता. याच दरम्यान घरी इतर कुणी नसल्याचा फायदा उचलून अब्बासने बाळाची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर आरोपी बाप घराला टाळा लावून फरार झाला होता.

हे वाचलं का?

आईला बसला धक्का

मस्जिदमधला कार्यक्रम आटपून पत्नी जेव्हा घरी आली, त्यावेळेस घराला टाळा होता.त्यामुळे तिने आब्बासला फोन लावला,पण त्या फोन उचललाच नाही. म्हणूव अब्बासच्या पत्नीने घराचा टाळा तोडला. टाळा तोडल्यानंतर घरात प्रवेश करताच तिला मोठा धक्का बसला. कारण घरात तिचं 13 महिन्याचं बाळ मृताअवस्थेत पडलं होत. आपल्या 13 महिन्याच्या बाळाची अशी अवस्था पाहून यास्मीन बेशुद्ध झाली होती.

या घटनेनंतर मामा अली हुसैन बोहराने वडील अब्बास बोहरावर बाळाच्या हत्येचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी य़ा घटनेचा तपास करायला सुरूवात केली होती. या तपासा दरम्यान पोलिसांनी रामगजमडीवरून आरोपी वडिलाला अटक केली. या अटकेनंतर आरोपी अब्बास बोहराला कोर्टात हजर करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MNS:रस्ते, टोल.. अन् कोकणी माणूस.. राज ठाकरेंनी टार्गेट का बदललं, मनात नेमकं काय?

कोर्टातील चौकशील अब्बासने मुलाच्या हत्येचं धक्कादायक कारण सांगितलं. माझा लहान मुलगा माझ्यासाठी अशुभ होता. त्याच्या जन्मानंतर मी सतत आजारी पडायचो. तसेच मी कोणतेही काम केल्यास, त्यात मला अपयश यायचं. माझ्यावर कर्जाचा डोंगर देखील वाढला होता. त्यामुळे मुलगा माझ्यासाठी अशुभ असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली आरोपी बापाने कोर्टात दिली. आरोपी बापाने दिलेले हे हत्येचं कारण एकूण संपूर्ण कोर्टाला धक्का बसला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT