शिक्षिकेच्या फेसबुकवर लावला न्यूड फोटो, नववीच्या विद्यार्थ्याचं भयंकर कृत्य

ADVERTISEMENT

student studying ninth standard created fake account teacher and defamed uploading nude photos
student studying ninth standard created fake account teacher and defamed uploading nude photos
social share
google news

Uttar Pradesh Crime : गोरखपूरमधील एका कॉन्व्हेंट शाळेतील (Convent School) शिक्षिकेचा बनावट सोशल मीडियावर (Social Media) अकाऊंड (Fake Account) बनवल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर, इतकंच नाही तर त्या अकाऊंटचे प्रोफाईल पिक्चरला नग्न फोटोही लावण्यात आला होता. सोशल मीडियावर आपल्या नावाचे खोटे अकाऊंट काढल्याची गोष्ट शिक्षिकेला समजताच त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला.

शाळा समितीलाच बसला धक्का

या घटनेची माहिती त्या शिक्षिकेने तात्काळ शाळा व्यवस्थापन समितीला दिली. या धक्कादायक घटनेबाबत पीडित शिक्षिकेनेही पोलिसातही तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता आयटीसेलकडून देण्यात येत आहे. नववीच्या विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याने अनेकांना धक्का बसला आहे मात्र आता हे प्रकरण पोलिसात गेल्याने त्याने हे असं का केले आहे त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> Rajasthan CM : राजस्थानात वसुंधरा ‘राज’ नाहीच! भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री

शिक्षिकेची बदनाम

ही घटना शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये घडली आहे. ज्यावेळी पीडित शिक्षिका शाळेत पोहचल्या होत्या, त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना तुमच्या नावाने बनावट अकाऊंट काढून तुमची बदनामी करण्याचा कोणाकडून तरी प्रयत्न केला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्या अकाऊंटच्या प्रोफाईलवर न्यूड फोटो लावण्यात आल्याने जोरदार खळबळ उडाली. त्यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांनी थेट या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आक्षेपार्ह फोटो व्हायरल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकून अकाऊंट काढल्यानंतर आणि त्या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षिका आणि त्यांच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना माहिती देण्यात आली.

प्रकरण थेट आयटी सेलकडे

या प्रकरणाची माहिती पोलीस उपअधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनीही तात्काळ पाऊलं उचलत या प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी प्रथम या प्रकरणाची चौकशी आयटी सेलकडे दिली. पोलीस अधीकांनी आयटी सेलकडून अहवाल मागवल्यानंतर त्यांना हे समजले की, नववीमधील विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आता चौकशी सुरु असून मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> MLA Disqualification Case : “शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, तर राज्यपालांना ठराव का पाठवला?”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT