Surat : ‘मेल्यानंतर कुणाला…’, कुटुंबातील 7 जणांची मृत्युला मिठी, सुसाईड नोटमध्ये काय?
Surat family suicide News in marathi : सूरतमध्ये एका व्यावसायिकांसह कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. व्यावसायिकाने आई-वडील, पत्नी आणि मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ADVERTISEMENT
Surat mass suicide Latest Update : गुजरातमधील सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांनी मृत्यूला मिठी मारली. त्यामुळे गुजरातमध्येच खळबळ उडाली आहे. एका व्यावसायिकाने आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांची विष पाजून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये व्यावसायिकाने आपली व्यथा मांडली आहे. (seven family members found dead in surat, what is in the suicide note)
ADVERTISEMENT
झालं असं की, कनुभाई सोलंकी यांचे कुटुंब सुरतच्या अडाजन भागात राहायला होते. सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई, त्यांची पत्नी, मुलगा मनीष उर्फ शांतू, मनीषची पत्नी रीता, त्यांच्या दोन मुली दिशा, काव्या आणि मुलगा कुशल असे हे मोठे कुटुंब होते.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट
मनीष यांचा इंटिरियर डिझाईन आणि फर्निचरचा व्यवसाय होता. कुटुंब खूप आनंदी होते. कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. पण, हे सगळं दिसण्यापुरतंच होतं. मनीष यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक नव्हते. याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सोलंकी कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Video : जन्म देणाऱ्या आईचे जनावरासारखे हाल! गळा दाबला, डोकं आपटलं अन्…
चिमुकल्यांसह सात मृतदेहाने परिसरावर शोककळा पसरली. नातेवाईकांच्या आक्रोशाने आणि टाहोने संपूर्ण परिसर हळहळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करताना पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात कोणाचेही नाव नाही. मात्र मनीष यांनी कुणा कुणाला पैसे दिले आणि कुणाकडून पैसे न मिळाल्याच्या त्रासाबद्दल लिहिले आहे. मेल्यानंतर मी कुणालाही त्रास देणार नाही, असेही लिहिले आहे.
यासोबतच व्यावसायिकाने लिहिले आहे की, “मी दिवस कसे घालवत आहे, हे माझ्या मनाला माहीत आहे. मी गेल्यानंतर माझी मुलं, आई वडील कसे जगतील? ते माझ्याशिवाय जगू शकत नाहीत, हीच चिंता मला सतावत आहे. हे पत्र लिहिण्यामागे काही वैयक्तिक कारणे असू शकतात, पण त्यांची नावे मला येथे द्यायची नाहीत. जिवंत असताना कुणाला त्रास दिला नाही, मृत्यूनंतरही कुणाला त्रास द्यायची इच्छा नाही.”
ADVERTISEMENT
सुसाईड नोटसोबत सापडली रिकामी बाटली
याप्रकरणी डीसीपी राकेश बारोट यांनी सांगितले की, सुसाईड नोटसोबत घरातून एक रिकामी बाटली सापडली आहे. बहुधा त्यात विष होते. मनीष यांच्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांचा विषामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, तपास सुरू आहे. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मनीष यांनी आधी आपल्या कुटुंबीयांना विष पाजले आणि नंतर गळफास लावून घेतला असावा, असा तपास करत असलेल्या पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, सत्य काय आहे ते तपासानंतरच कळेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT