Crime : चव बिघडली अन् आईचा विळ्याने चिरला गळा, पोलिसही हादरले

ADVERTISEMENT

thane crime story boy killed her mother by an attack on the neck with a sickle thane news
thane crime story boy killed her mother by an attack on the neck with a sickle thane news
social share
google news

Thane Crime News Boy Killed Her Mother : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पोटच्या पोरानेच आईची (Mother Killed) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने दिलेले जेवण स्वादिष्ट न लागल्याने तरूणाने संतापून विळ्याने गळ्यावर वार करून तिची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी मुलगा आईला रक्ताच्या थारोळ्यात सोडून बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला होता.या घटनेने आता ठाणे हादरले (Thane Crime) आहे. (thane crime story boy killed her mother by an attack on the neck with a sickle thane murbad news)

न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मुरबाड (Murbad) तालुक्याच्या वेलू गावात ही घटना घडली आहे. मृत महिला आणि तिच्या मुलामध्ये घरगूती वादावरून नेहमीच भांडणे व्हायची. त्या दिवशी असेच रविवारी घरी आलेल्या मुलाला 55 वर्षीय आईने जेवायला दिले. हे जेवण खाताच मुलगा संतापला.

हे ही वाचा : MNS : राज ठाकरे CM शिंदेंवर भडकले; म्हणाले, “नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार,पण…”

आईने बनवलेले जेवण न आवडल्याने मुलाने तु स्वादिष्ट जेवण का नाही बनवलेस? असा सवाल केला. याच मुद्यावरून माय लेकामध्ये मोठा वाद झाला. आई- मुलाच्या या शाब्दीक भांडणात मुलानेच अचानक घरात पडलेली विळी हातात घेतली आणि या विळीने थेट आईच्या मानेवरच वार केला. या हल्ल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्या जमीनीवर पडली आणि तिचा दुदैवी मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पोराने झोपेच्या गोळ्या खाऊन तो बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. आणि आरोपी मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

रुग्णालयात मुलगा शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याला हत्येचे कारण विचारले असता आरोपी म्हणाला, माझी आई मला स्वादिष्ट जेवण देत नाही. याच गोष्टीवरून मी नाराज होतो.रविवारी देखील तिने दिलेले जेवण हे स्वादिष्ट नव्हते. याच गोष्टीवरून मला राग आणि आमच्यात भांडणे झाली. या भांडणातून मी विळेने आईवर वार करून तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?

या प्रकरणात अद्याप आरोपी मुलाला अटक करण्यात आली नाही आहे. त्याच्यावर सध्या उपचार सूरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT