दुर्देवी! महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा अंत
टिटवाळामधील बल्याणीमध्ये महामार्गासाठी खोदलेल्या खड्यात तीन वर्षाच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रस्त्यासाठी खोदलेल्या खड्यात चिमुकलीचा अंत
टिटवाळ्यात चिमुकलीचा खड्यात बुडून मृत्यू
Titwala News: टिटवाळामधील बल्याणी परिसरात मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी खोल खड्डा खोदण्यात आला आहे. शुक्रवारी याच खड्यांजवळ दुपारी रहमुनिसा रियाज शाह या तीन वर्षाच्या मुलीचा खड्ड्यात पडून मृत्यू (Death) झाला आहे. बालिकेच्या मृत्यूमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बालिकेचा मृत्यू झाल्याने टिटवाळा पोलिसांनी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
टिटवाळ्यातील बल्याणीमध्ये 27 तारखेपासून शेख पीर वल्ली शाह बाबाचा उरूस सुरू आहे. या उरूसाच्यानिमित्ताने मीरा भाईंदरमधील त्यांच्या नातेवाईकांकडे रियाझ शाह हे आपल्या तीन वर्षांच्या रेहमुनिसाला घेऊन आले होते.
हे ही वाचा >> VIDEO : वन चाय प्लीज! डॉली चायवाल्याच्या टपरीवर बिल गेट्स, चहाचा लुटला आनंद
त्यानंतर दुपारी रेहमुनिसा कुटुंबीयांना कुठेच दिसली नाही, म्हणून सगळ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तरीही ती कुठेच सापडली नाही, त्यामुळे नातेवाईकांनी पाण्याने भरलेल्या खड्यात जाऊन पाहिले असता रेहमुनिसाचा मृतदेह पाण्यावर तरंगतान आढळून आला.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीवर आधी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेल्याची तक्रार नातेवाईकांसह येथील नागरिकांनी केला आहे.
यापूर्वीही या खड्ड्यात दोन ते तीन मुले पडून जखमी झाल्याचेही नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी हायवे कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Vidhan Sabha : देवेंद्र फडणवीसांना धमकी, रोहित पवारांचा फोन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT