न्यायाधीशांवरच विनयभंगाचा आरोप, न्यायालयाच्या चेंबरमध्येच घडली घटना
न्यायालयातील चेंबरमध्ये जी अत्याचारग्रस्त महिला न्याय मागण्यासाठी गेली होती, त्याच महिलेचा न्यायाधीशांनी विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आता त्रिसदस्यीय समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
न्यायालयाच्या चेंबरमध्येच महिलेचा विनयभंग
न्यायाधीशावरच विनयभंग केल्याचा आरोप
न्यायाधीशांनी केला चेंबरमध्ये विनयभंग
Sexual Abuse : न्यायालयातच बलात्कार पीडितेचा लैंगिक छळ (sexual harassment) झाल्याची खळबळजनक घटना त्रिपुरातील कमालपूरमध्ये घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पीडितेचा विनयभंग अन्य कोणी केला नसून न्यायालयाच्या (Court) न्यायाधीशांनी (Judge) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कार (Rape case) पीडित मुलगी तिच्या केसबाबत जबाब नोंदवण्यासाठी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये गेली होती, मात्र तिथे गेल्यानंतर तिला चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे तिने पतीकडे पळून जात वकिलाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी आता त्रिसदस्यीय समिती नेमून संशयित आरोपीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
न्यायाधीशांकडून विनयभंग
संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्याबाबत ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी संबंधित महिला आपल्या बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये गेली होती. त्यानंतर या प्रकरणी कमालपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, "मी माझी तक्रार नोंदवण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये गेलो होतो. मात्र त्यावेळी माझं म्हणणं मांडत असताना न्यायाधीशांकडून विनयभंग करण्यात आला."
चेंबरमध्येच विनयभंग
चेंबरमध्ये महिलेचा विनयभंग केल्याने ती महिला बाहेर आली, आणि घडलेली घटना वकील आणि आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तर लैंगिक छळ केल्या प्रकरणी कमालपूर बार असोसिएशनकडे या घटनेची वेगळी तक्रार नोंदवण्यात आली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> 'NCP शरदचंद्र पवार' हेच नाव कायम ठेवावं' पवार गटाची मागणी
त्रिसदस्यीय समिती
धलाई जिल्हा-सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या समितीने या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयित आरोपी न्यायाधीश विश्वतोष धर यांच्या विरोधात कमालपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
चौकशीनंतर कारवाई
न्यायमूधीशांवर लावण्यात आलेल्या आरोपाला उत्तर देताना त्रिपुरा उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले की, याबाबत आमच्याकडे अद्याप या विषयावर कोणतीही तक्रार आली नाही. आम्हालाही माध्यमांकडूनच ही घटना समजल्याचेही सत्यजित दास यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी लेखी तक्रार आल्यानंतर त्याबाबत आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
अक्षम्य घटना
सत्यजीत दास यांनी सांगितले की, 'ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोणतीही व्यक्ती आपल्याला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात जात असते, त्यामुळे ही घडलेली घटना ही अक्षम्य असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 'आदर्श घोटाळा भाजपनं उघडकीस आणला' सुळेंनी नेमकं ते सांगितलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT