Crime : तीन महिन्यांनी होणार होते धुमधडाक्यात लग्न, पण एका फोन कॉलने…, काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uttar pradesh crime banda girl depressed on marriage commit suicide crime news
uttar pradesh crime banda girl depressed on marriage commit suicide crime news
social share
google news

Uttar Pradesh Crime News : राज्यात तुळशी विवाहानंतर लग्नांना सुरुवात होणार आहे. तत्पुर्वीच लग्न जमली आहेत आणि मुहुर्त मात्र तुळशी विवाहानंतरची आहेत. अशात एका लग्न जन्मलेल्या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरूणीला एक फोन कॉल आला होता आणि त्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ज्योती असे या 22 वर्षीय तरूणीचे नाव आहे. तरूणीच्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (uttar pradesh crime banda girl depressed on marriage commit suicide crime news)

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदामध्ये (Banda) ही धक्कादायक घटना घडली आहे. बबेरू कोतवाली क्षेत्रातील दतौरा गावात शिवपूजन वर्मा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. शिवपूजन वर्मा यांची ज्योती ही सर्वात लहान मुलगी होती. या ज्योतीचे वडिलांनी चित्रकुटमध्ये तिचे लग्न जमवलं होते. आणि आता 29 फेब्रुवारीला नवरा मुलगा तिच्या घरी वरात घेऊन येणार होता. मात्र अचानक मुलाकडच्या कुटुंबियांनी ज्योतीच्या कुटुंबियाला लग्नास नकार कळवला होता. या नकारामुळे तरूणी मानसिक तणावात आली होती आणि यातूनच तिने आत्महत्या केली होती.

हे ही वाचा : 200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार, विराट-रोहितला संघात स्थान मिळणार की नाही?

तरूणीने उचललं टोकाच पाऊल

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलांच्या कुटुंबियांकडून एक फोन कॉल आला होता. या फोन कॉलवर त्यांनी लग्नास नकार दिला गेला आणि नाते तोडत असल्याचे सांगितले. ही बाब तरूणीला कळताच ती मानसिक तणावात आली होती. या तणावातून तरूणीने स्वत:ला एका खोलीत बंद केले. त्यानंतर पंख्याला लटकून गळफास घेतला.

हे वाचलं का?

दरम्यान अनेक तास उलटून देखील तरूणी खोली बाहेर न आल्याने कुंटुंबियांना काळजी वाटू लागली. या काळजीपोटी कुटुबियांनी दरवाजा ठोठवायला आणि मुलीला आवाज द्यायला सुरूवात केली. मात्र मुलीकडून आतूनच काही एक उत्तर आले नाही. त्यानंतर खिडकीतून खोलीत पाहिले असता तरूणीने गळफास घेतला होता.

हे ही वाचा : Baba Ramdev : “…तर आम्ही एक कोटींचा दंड ठोठावू”, सुप्रीम कोर्ट संतापले, पतंजलीला झापले

या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडत तरूणीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टमसाठी देखील पाठवला आहे.आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे कारण काय समोर येते याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने तरूणीच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

बबेरूच्या दतौरा गावची रहिवाशी असलेल्या 22 वर्षीय ज्योतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाकडून लग्नास नकार कळवण्यात आल्याने तिने हा टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत,अशी माहिती राकेश कुमार सिंह यांनी दिले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT