200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार, विराट-रोहितला संघात स्थान मिळणार की नाही?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

icc t20 World cup 2024 virat kohli ravichandran ashwin rohit sharma 35 plus player
icc t20 World cup 2024 virat kohli ravichandran ashwin rohit sharma 35 plus player
social share
google news

ICC T20 World Cup 2024 : 19 नोव्हेंबर 2023 ला टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप 2023 चा फायनल हरली. हा दिवस कोणताच भारतीय क्रिकेट फॅन्स विसरू शकत नाही. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट फॅन्स पराभवाच्या दुखात आहेत. या दुखातून त्यांना सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. असे असले तरी आता अवघ्या 200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. पण भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी वयाची पस्तीशी गाठलीय. या खेळाडूंना संघात संधी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. (icc t20 World cup 2024 virat kohli ravichandran ashwin rohit sharma 35 plus player)

कधी आहे टी20 वर्ल्ड कप?

आयसीसीचा वनडे वर्ल्ड कप संपल्यानंतर आता टी20 वर्ल्ड कपची (ICC T20 World Cup 2024) उत्सुकता क्रिकेट फॅन्सना लागली आहे.येत्या 4 ते 30 जून 2024 दरम्यान हा टी20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. आजपासून (22 नोव्हेंबर) 195 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार अनुभवता येणार आहे. या टी20 वर्ल्ड कपचे यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरीकेकडे असणार आहे.विशेष बाब म्हणजे, अमेरीकेत खेळवला जाणारा हा पहिला वर्ल्ड कप असणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा : Manoj Jarange : अजित पवारांनी नेत्यांना दिली तंबी, जरांगे म्हणाले, “तशीच तंबी…”

दरम्यान गेल्यावेळी इग्लंडने टी20 वर्ल्ड कप 2022 जिंकला होता. तर टीम इंडियाने माजी कर्णधार महेंद्र सिंहच्या नेतृत्वाखाली 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता 17 वर्षानंतर पुन्हा टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे आणि मेगा प्लॅन तयार करते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विराट, रोहित आणि अश्विनला संधी मिळणार का?

टीम इंडीयाच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी सध्या वयाची 35 शी गाठली आहे. या खेळाडूंमध्ये सर्वाधिक वय रविचंद्रन अश्विनचे आहे, त्याचे वय 37 वर्ष आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे वय 36 वर्ष आहे. तर विराट कोहलीचे वय 35 वर्ष आहे. विशेष म्हणजे, या तीनही खेळाडूंनी त्यांचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप इंग्लंड विरूद्ध 10 नोव्हेंबर 2022 ला एडिलेडमध्ये खेळले होते. हा टी20 वर्ल्ड कपचा सेमी फानयल सामना होता. अशात आता या खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान वर्ल्ड कप संघात असलेला मोहम्मद शमी आणि सुर्यकुमार यादव 33 वर्षांचा आहे. शार्दुल ठाकूर 32, रविंद्र जडेजा 34 आणि लोकेश राहुल 31 वर्षाचा आहे. त्यानंतर हार्द‍िक पंड्या (30), मोहम्मद स‍िराज (29), श्रेयस अय्यर (28), जसप्रीत बुमराह (29), कुलदीप यादव (28), ईशान किशन (25) वयाचे आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ratnagiri : लग्न घरातून वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा! हळदीला जाताना घडला अनर्थ

सचिन तेंडूलकर 40 वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तर महेंद्र सिंह धोनी 38 वर्षापर्यंत क्रिकेट खेळला आहे आणि अजूनही तो आयपीएलमध्ये खेळतो आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या सीनीयर खेळाडूंचा टी20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट होणार का? की त्यांना संघात स्थान मिळणार, हे आगामी काळात कळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT