Dinesh Karthik बनला रिअल थाला! रोहित शर्माची भविष्यवाणी ठरणार खरी?
Dinesh Karthik IPL 2024: IPL 2024 मध्ये, 11 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. आरसीबीचा दिनेश कार्तिक (DK) फलंदाजी करत होता, रोहित शर्मा, स्लिपवर इशान किशनच्या शेजारी उभा होता, त्यावेळी सामन्यादरम्यान तो म्हणाला, 'शाबास डीके, वर्ल्ड कप अजून खेळायचा आहे.' (
ADVERTISEMENT
Dinesh Karthik IPL 2024: IPL 2024 मध्ये, 11 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. आरसीबीचा दिनेश कार्तिक (DK) फलंदाजी करत होता, रोहित शर्मा, स्लिपवर इशान किशनच्या शेजारी उभा होता, त्यावेळी सामन्यादरम्यान तो म्हणाला, 'शाबास डीके, वर्ल्ड कप अजून खेळायचा आहे.' (IPL 2024 rcb vs srh match records first time in ipl and t20 cricket history 4 bowlers conceded 50 runs for a team)
ADVERTISEMENT
हे ऐकून दिनेश कार्तिक हसला आणि फलंदाजीला लागला. कार्तिकने त्या सामन्यात 23 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. तर, सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे तो, ऋषभ पंत, संजू सॅमसन, केएल राहुल, इशान किशन आणि जितेश शर्मा यांसारख्या गोलंदाजानसमोर आव्हान बनला. विशेष म्हणजे T20 विश्वचषकापूर्वी....
दिनेश कार्तिकचा बदललेला फॉर्म आयपीएलमध्ये पुन्हा दिसून येत आहे, एक गोष्ट निश्चित आहे की तो इतर विकेटकीपर्ससाठी आव्हान बनला आहे. डीके 38 वर्षांचा आहे. तो आजपर्यंत ज्या प्रकारे आयपीएलमध्ये खेळत आहे, त्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की त्याच्यात या फॉरमॅटमध्ये खेळण्याची ताकद अजूनही आहे.
हे वाचलं का?
अशावेळी, रोहित शर्माने दिनेश कार्तिकला जरी गंमतीत म्हटलं असेल तरी आता तो टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळण्यासाठी विकेटकीपर्सच्या शर्यतीत उतरला आहे.
15 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कार्तिकने आपल्या स्फोटक खेळीने 5 चौकार आणि 7 षटकार ठोकले. या कालावधीत स्ट्राइक रेट 237.14 होता. वयाच्या या टप्प्यावर 'सुपरफिट' कार्तिकने 108 मीटरचा षटकारही मारला.
ADVERTISEMENT
चिन्नास्वामी स्टेडियमवर आलेले अनेक क्रिकेट चाहते त्याच्या नावाचे फलक लावून त्याचे समर्थन करताना दिसले, एका चाहत्याने तर 'द रिअल थाला' असे पोस्टरही दाखवले. थाला महेंद्रसिंग धोनीला म्हणतात. चाहत्यांच्या नजरेत कार्तिकचा दर्जा वाढला आहे यावरून याचा अंदाज बांधता येतो.
ADVERTISEMENT
कार्तिक क्रिकेटच्या ऑफ सीझनमध्ये कॉमेंट्री करतानाही दिसतो. या आयपीएलमध्ये कार्तिक आरसीबीकडून खेळत आहे, जो संघ म्हणून अपयशी ठरला असला तरी कार्तिक हिट ठरला आहे. कार्तिकने आतापर्यंत 7 सामन्यात 226 धावा केल्या आहेत. या काळात त्याची एव्हरेज 75.33 आणि स्ट्राइक रेट 205.45 आहे.
दिनेश कार्तिकची क्रिकेट कारकीर्द
-
26 कसोटी, 1025 धावा, 25.00 एव्हरेज, 57 कॅच, 6 स्टंप
-
94 वनडे, 1752 धावा, 30.20 एव्हरेज, 64 कॅच, 7 स्टंपिंग
- 60 T20E, 686 धावा, 26.38 एव्हरेज, 30 कॅच, 8 स्टंपिंग
- 249 आयपीएल, 4742 धावा, 26.64 एव्हरेज, 142 कॅच, 36 स्टंप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT