शेतात सापडले माजी सरपंचाच्या बायकोचे मुंडके, रेशन दुकानदारावर संशय, बॉडी अजूनही गायब

मुंबई तक

एका शेतात महिलेचे मुंडके आढळून आले आहे. गावातील माजी सरपंचाच्या बायकोचे हे मुंडके असल्याचे समोर आले आहे. माजी सरपंचाने बायकोच्या खूनाचा आरोप रेशन दुकानदारावर लावला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

शेतात सापडले माजी सरपंचाच्या बायकोचे मुंडके

point

रेशन दुकानदारावर संशय

point

बॉडी अजूनही गायब

Crime News : एका शेतात महिलेचे मुंडके सापडल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (28 मार्च) सकाळी एका शेतात मोहरीच्या कापणीसाठी गेलेल्या मजुरांना हे मुंडके दिसले. या मुंडक्याजवळ सापडलेले केस आणि कपड्यांच्या आधारे महिलेची ओळख पटली आहे. चंद्रावती असे या मृत महिलेच्या पतीचे नाव असून ती गावच्या माजी सरपंचाची बायको आहे. मृत चंद्रावती गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होत्या. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर परिसरातील ही घटना आहे. 

शेतात आढळली मानवी कवटी

मिळालेल्या माहितीनुसार, सेवाराम नावाच्या व्यक्तीच्या शेतात मोहरीचे पीक कापण्यासाठी मजूर गेले असता त्यांना तिथे मानवी कवटी दिसून आली. घाबरलेल्या मजुरांनी तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. माजी सरपंच रामनिवास वर्मा यांनी घटनास्थळी धाव घेत दावा केला की, कवटीचे दात आणि जवळ सापडलेले केस व ब्लाऊज हे त्यांच्या पत्नीचेच आहेत. त्यांनी स्थानिक रेशन दुकानदार मिट्ठूलाल याच्यावर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.

हे ही वाचा : सोलापूर : अर्ध्या तासात येतो असं सांगून घराबाहेर पडला, चौदा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला जिम ट्रेनरचा मृतदेह

रेशन दुकानदारावर गंभीर आरोप

रामनिवास यांनी पोलिसांना सांगितले की, 31 जानेवारी रोजी गावात एका कार्यक्रमात ढोलक वाजवण्यासाठी चंद्रावती गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. त्यांनी सुरुवातीला मिट्ठूलाल विरोधात अपहरण आणि दागिने व 50 हजार रुपये चोरल्याची तक्रार दिली होती. 20 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र तपास पुढे सरकला नाही. या प्रकरणात राजकीय वैमनस्य असल्याचीही चर्चा असून, मिट्ठूलालने निवडणुकीत विरोधात काम केल्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा : थोरल्या बहिणीला बॉयफ्रेंडसोबत शेतात पकडले, नंतर धाकट्या बहिणीसोबत घडलं भयंकर

डीएनए चाचणी करणार

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप शरीराचा उर्वरित भाग मिळालेला नाही. पोलिसांनी स्पष्ट केले की, हा सांगाडा चंद्रावती यांचाच आहे की नाही, हे तपासण्यासाठी रविवारी (29 मार्च) डीएनए (DNA) नमुने पाठवण्यात येतील. डीएनए रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
 

हे वाचलं का?