नवजात बाळाला झुडुपात टाकले, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडत रस्त्यावर आणले; आई-बाप का झाले क्रूर?
आई-बाप आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला झुडुपात टाकून गेले. यानंतर भटक्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले. यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. आज (28 मार्च) सकाळीच ही घटना घडली. हे आई-बाप कोण आणि ही घटना नेमकी कुठे घडली जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवजात बाळाला झुडुपात टाकले
भटक्या कुत्र्यांनी लचके तोडत रस्त्यावर आणले
आई-बाप का झाले क्रूर?
Crime News : माणूस किती क्रूर वागू शकतो याची अनेक उदाहरणे आपण बघत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एका नवजात बालकाला रस्त्याशेजारील झुडुपात टाकून आई-बाप पळाले. त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं काय होईल याचा जराही विचार त्यांनी केला नाही. ते नवजात बाळ त्या झुडुपात पडलेलं असतानाच काही भटक्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. आज (28 मार्च) सकाळीच ही घटना घडली. हे आई-बाप कोण आणि ही घटना नेमकी कुठे घडली जाणून घेऊया.
भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
उत्तर प्रदेशातील पीलीभीत मधील ही घटना आहे. येथील एका रस्त्याच्या शेजारी असलेल्या झुडुपात कोणीतरी नवजात बाळाला टाकून पळून गेले होते. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना याचा सुगावा लागला आणि त्या या बाळाचे लचके तोडले. यापेक्षा भयानक म्हणजे या बाळाचे लचके तोडत-तोडत कुत्र्यांनी त्याला रस्त्यावर ओढत आणले होते. या ठिकाणी जमलेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या बघून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाटसरुंना काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्यांना जबरदस्त धक्का बसला. एक नवजात बाळ त्यांना याठिकाणी दिसले.
हे ही वाचा : बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..
बघ्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले
यानंतर मोठ्या परिश्रमाने वाटसरुंनी या भटक्या कुत्र्यांना हुसकावून लावले आणि त्या नवजात बाळाची सुटका केली. याठिकाणी उपस्थित असलेल्या एका वाटसरुने सांगितले की, भटक्या कुत्र्यांनी तोडलेल्या लचक्यांमुळे त्या बाळाचा जीव गेला होता. यानंतर या बाळाला सरकारी दवाख्यान्यात हलवण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर मृत बाळाचे पोस्ट मार्टमदेखील करण्यात आले.
हे ही वाचा : आरोपीने 8 वर्षाच्या मुलीची केली हत्या, नंतर मृतदेह पिठाच्या डब्यात भरला अन् पुढे...
बाळाचे आई-बाप कोण?
दरम्यान, हे बाळ नेमकं कुणाचं आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या बाळाला झुडुपात टाकणाऱ्या जन्मदात्या माता-पित्याला थोडीशीही दयामया वाटली नाही का असा सवाल आता विचारला जात आहे. जर बाळ नकोच होतं तर त्याला अनाथाश्रमात सोडून द्यायला हवं होतं अशा प्रतिक्रियाही लोक देत आहेत.









