इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात, तब्बल 4 वर्ष शिक्षिकेवर बलात्कार
उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एका शिक्षिकेची आणि युवकाची इन्स्टाग्रामवर आधी ओळख झाली. नंतर त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. मैत्री झाल्यामुळं भेटीगाठी होत गेल्या आणि त्याच ओळखीचा फायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवत युवकाने गेल्या चार वर्षापासून शिक्षिका असलेल्या मुलीवर त्याने बलात्कार केला आहे.
ADVERTISEMENT

Rape Case: गाझियाबादमधील (Uttar pradesh Ghaziabad) मधुबन बापुधाम पोलीस स्टेशन परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका महिला शिक्षिकेवर बलात्कार (Teacher Rape Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी दबाव आणल्यानंतर मात्र आरोपीने लग्नास (Marriage) नकार दिला. त्यानंतर या प्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलिसात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत युवकाला अटक केली आहे.
लग्नाचं आमिष
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या पीडित मुलगी ही शिक्षिका असून ती मधुबन बापुधाम परिरात राहणारी असून तिने कौशांबीमधील रहिवासी आयुष अग्रवालविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आयुष हा एका खासगी कंपनीत अकाउंटंट असून तो गेल्या चार वर्षापासून त्या मुलीच्या संपर्कात आहे.
हे ही वाचा >> Crime : डेटिंग अॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…
इन्स्टाग्रामवर ओळख
आयुष अग्रवाल आणि पीडितेची ओळख चार वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवरून झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर नंतर त्यांच्या मैत्रीत झाले. नंतर ती वारंवार भेटू लागली. त्या भेटीदरम्यान आयुषने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तुझ्याबरोबर लग्न करतो असं सांगून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
चार वर्षापासून बलात्कार
पीडितेने आयुषवर गंभीर आरोप केले असून त्याने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही वर्षापासून त्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. मात्र ज्यावेळी तिने त्याला लग्नासाठी विचारले तेव्हा मात्र त्याने नकार देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला तू पोलिसात तक्रार दिलीस तर तुला ठार मारीन अशी धमकीही दिली होती असंही मुलीने तक्रारीत म्हटले आहे.










