सिगारेटीचे चटके, नखं ओरबाडली... प्रेयसीने केला प्रियकराचा भयंकर छळ, अखेर जीव गेला!
एका महिला लिव्ह इन पार्टरने पुरुष सहकाऱ्याचा अमानुष छळ करुन हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. श्रद्धा असं या संशयित आरोपी महिलेचं नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिगारेटीचे चटके, नखं ओरबाडली
प्रेयसीने केला प्रियकराचा भयंकर छळ
अखेर जीव गेला!
Crime News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला लिव्ह इन पार्टनरने अमानुष छळ करुन आपल्या पुरुष सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. लखनऊच्या हजरतगंजमधील अवध ग्रीन अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. शिवा शर्मा या तरुणाचा इमारतीवरुन पडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. तो परिसरात एक कॅफे चालवत होता. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास रश्मी दुबे नावाच्या तरुणीने फोन करून शिवाचा अपघात झाल्याचे आणि त्याला लोहिया रुग्णालयात नेल्याचे त्याच्या आईला सांगितले. मात्र, परिजन लोहिया रुग्णालयात पोहोचले असता तिथे शिवाचा कोणताही पत्ता लागला नाही. तब्बल दीड तासानंतर त्याला मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात हलवल्याची माहिती मिळाली.
शिवाला जखमी अवस्थेत ठेवून फरार
मेडिकल कॉलेजच्या बाहेर पोहोचल्यावर रश्मीची बहीण श्रद्धाचा ड्रायव्हर डॅनिश हा सौरव कश्यप असल्याचे भासवून फोन करत असल्याचे समोर आले. कुटुंबीयांना पाहताच तो गंभीर जखमी शिवा आणि रुग्णवाहिका तिथेच सोडून फरार झाला. रुग्णवाहिका चालकाने सांगितले की, तो गेल्या तीन तासांपासून जखमीला घेऊन लोहिया आणि मेडिकल कॉलेजच्या फेऱ्या मारत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शिवाला मृत घोषित केले.
हे ही वाचा : 'मोदी-शाहांच्या मनात अत्यंत पराकोटीची...', राज ठाकरेंचा प्रचंड संताप अन् जोरदार हल्लाबोल!
पाच महिन्यांपासून अमानुष छळ
शिवाच्या आईने गंभीर आरोप केला आहे की, तिच्या मुलाला आधी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली आणि नंतर खाली फेकून दिले. मृताच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या; दोन्ही डोळे सुजले होते, जबडा मोडला होता, कान-नाक रक्तबंबाळ होते आणि बरगड्या व पायही मोडले होते. संपूर्ण अंगावर सिगरेटने चटके दिल्याच्या आणि नखे ओरबाडल्याच्या खूणा होत्या. श्रद्धा दुबे मागील 4-5 महिन्यांपासून शिवाला सतत त्रास देत असून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
हे ही वाचा : धुळे : पायाला साखळी बांधून कुलूप लावलं अन्... तापी नदीत सापडले मृतदेह, प्रेमविवाहानंतर जोडप्यासोबत काय घडलं?
नेमकं काय घडलं?
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, हा तरुण चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणाला खाली ढकलले की यामागे इतर काही कारण आहे, या सर्व तांत्रिक आणि फॉरेन्सिक बाजूंचा पोलीस कसून तपास करत आहेत.
