Crime : मित्राच्या गर्लफ्रेंडवर डोळा, प्रपोझ करणं पडलं महागात, व्हॅलेंटाईन डे आधीच केला खेळ खल्लास!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime Story : उत्तराखंडमधील (Uttarakhand) रूडकीतील (Roorkee) कलियार भागात 11 फेब्रुवारी रोजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरूणाचा मृतदेह पोलिसांना सापडला. आसिफ अशी ओळख या मृत तरूणाची ओळख पटली. आसिफच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा (Murder Case) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी आसिफ शेवटचा मुराद अलीसोबत दिसल्याचे तपासात समोर आले. 


आरोपी मुरादला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला यावेळी तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असता चौकशीनंतर पोलिसांनी मुरादच्या सांगण्यावरून घटनेत वापरलेला चाकूही जप्त केला.

नेमकं आसिफसोबत काय घडलं? 

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यावेळी प्रपोझ डे हे आसिफच्या मृत्यूचे कारण ठरले. पोलीस चौकशीत आरोपी मुरादने सांगितले की, तो पतंजलीजवळ काम करतो. तो आणि आसिफ गेल्या दोन वर्षांपासून मित्र होते. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुराद त्याच्या गावी रहमतपूर येथे आला असता त्याची भेट सुहेलशी झाली. सायंकाळी दोघंही कलियार येथे आले होते आणि कबुतरखान्याजवळ बसले होते तेव्हा आसिफही तिथे आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तिघेही तिथे बसून बोलत होते. काही दिवसांपूर्वी प्रपोझ डेच्या दिवशी आसिफने सुहेलच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते, त्यावरून सुहेल आणि आसिफमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर मुराद आणि सुहेलने आसिफला मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक सुहेलने आसिफच्या छातीजवळ चाकूने वार केले. रागाच्या भरात मुरादनेही खिशात ठेवलेल्या चाकूने आसिफच्या पोटाजवळ वार केले. हत्येनंतर दोघांनीही तिथून पळ काढला. सध्या पोलीस सुहेलचा शोध घेत आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT