दहावीत शिकणाऱ्या मुलीला दारु पाजली अन् केला सामूहिक बलात्कार, दुकानात सामान आणायला गेलेल्या मुलीसोबत घडलं भयंकर
Crime News : दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घराशेजारील दुकानात सामान आणायला गेलेल्या मुलीला आरोपींनी कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे तिला जबरदस्तीने दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दहावीत शिकणाऱ्या मुलीला दारु पाजली अन् केला सामूहिक बलात्कार
दुकानात सामान आणायला गेलेल्या मुलीसोबत घडलं भयंकर
Crime News : दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घराशेजारील दुकानात सामान आणायला गेलेल्या मुलीला आरोपींनी कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे तिला जबरदस्तीने दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. उत्तराखंडच्या नैनिताल परिसरातील ही घटना आहे.
हे ही वाचा : जालना: आधी झाडाखाली, नंतर ढाब्यावर... 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
दारु पाजून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकत असून मंगळवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती घराशेजारील दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. तिथे तिला शेजारीच भाड्याने राहणारे मोहित (20) आणि प्रदीप (24) हे दोन तरुण भेटले. त्यांनी तिला फिरवून आणण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवले आणि निर्जनस्थळी नेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मुलीला दारु पाजली आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी
रात्री साडेदहा वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असता रस्त्यावर एक संशयास्पद कार उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, पीडित मुलगी तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी दोन्ही आरोपी देखील कारमध्येच होते. पोलिसांनी तातडीने मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आणि दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले.










