Crime : प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं; मग दोघांनी पतीसोबत केलं असं काही की…
Crime news : गतवर्षीही ऑक्टोबरमध्ये पत्नीने पतीवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. पण उपचारानंतर दोघांमध्ये समझोता झाला होता. आता पुन्हा एकदा पत्नी पतीच्या जिवावर उठली?
ADVERTISEMENT
Extramarital affair news :
ADVERTISEMENT
उत्तराखंड : येथील हल्दवानी शहरातून ‘पति, पत्नी और वो’ असं काहीसं प्रकरण समोर येतं आहे. पती बाजारातून घरी आल्यानंतर पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहताच पतीच्या पायाखालची जमीन सरकरली. यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून संबंधित पतीला मारहाण करत मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. या प्रकरणी पतीने तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (When the husband returned home from the market wife was inside with a stranger)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टिपीनगर परिसरात पिडीत पती पत्नी आणि 6 वर्षांच्या मुलीसह राहतो. पत्नी नैनिताल जिल्ह्यातीलच एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. 18 मार्चला पिडीत पती बाजारातून घरी परतल्यानंतर त्यांच्या घराबाहेर एक कार उभी होती. तर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावला पण तो उघडला नाही. काही वेळाने दरवाजा उघडला असता पत्नी अनोळखी व्यक्तीसोबत आत होती.
हे वाचलं का?
उपचारासाठी ऑस्ट्रेलियातून भारतात आली, महिलेचा बाथरूममध्ये सापडला मृतदेह
याबाबत विचारल्यावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून रागाच्या भरात पतीला बेदम मारहाण केली. यावेळी तिथं उपस्थित तरुणांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पतीने दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या दरम्यान, पीडितेने घरातील सीसीटीव्ही तपासले असता, पत्नीच्या प्रियकराचे येणं आणि जाण्यापर्यंत सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले.
अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं
गतवर्षीही ऑक्टोबरमध्ये पत्नीने पतीवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. पण उपचारानंतर दोघांमध्ये समझोता झाला होता. अशात आता पत्नी त्याला खोट्या प्रकरणात अडकवू शकते, सोबत दोघे मिळून आपली हत्या करू शकतात, अशी शंका पतीने व्यक्त केली आहे. हल्द्वानीचे पोलीस अधिकारी हरेंद्र चौधरी यांनी याबाबत सांगितले की, पीडित पतीच्या तक्रारीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT