Nallasopara : ‘डॉन को पकडना…’, अमिताभचा डायलॉग मारला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या, नेमकं काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

vasai virar crime accuse dialogue actor amitabh bachchan and police arrested tulinj police station
vasai virar crime accuse dialogue actor amitabh bachchan and police arrested tulinj police station
social share
google news

नालासोपारा (Nallasopara) शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचाच दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधमाने थेट पोलिसांनाच व्हाट्सअ‍ॅप कॉल करून आव्हान दिले होते. ‘डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है’, असा बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनचा डायलॉग मारला होता. आरोपींच्या या डायलॉग बाजीनंतर पोलिसांनीही हे आव्हान स्विकारले आणि आरोपी नराधमाला अटक केली आहे. धनंजय दुबे ऊर्फ जय दूबे (वय 45) अस् या आरोपीचे नाव आहे. या आरोपीविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vasai virar crime accuse dialogue actor amitabh bachchan and police arrested tulinj police station)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी धनंजय दुबेने त्याच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी प्रेयसीला नालासोपारा वरून वसईला बोलावून घेतले होते. वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर आरोपी धनंजय दुबे त्याच्या प्रेयसीला गाडीत बसवून नालासोपारा सोडायला निघाला. या दरम्यान गाडीतच धनंजयने प्रेयसीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने बिथरेलल्या पिडीतेने पलायन केले होते. मात्र ती कुठे गेली होती,याची कल्पना नव्हती. अगदी घरच्यांना देखील ती कुठे गेली आहे, याची माहिती नव्हती.

हे ही वाचा : ‘…अन् एकनाथ शिंदे रडायला लागले’, आदित्य ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?

या घटनेनंतर आपली मुलगी घरी न परतल्याने घाबरलेल्या पीडीतेच्या कुटुंबियांनी नालासोपारा पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता पिडीत तरूणीचा शोध सुरू केला होता. या तपासा दरम्यान पोलिसांना पिडीता आपल्या गावी राजस्थानमध्ये गेल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी पिडीत तरूणीला राजस्थानवरून नालासोपारात आणले होते.

हे वाचलं का?

मुलीला नालासोपारा शहरात घेऊन आल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. या चौकशीत तिने तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. खरं तर पीडितेने तिच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. याबरोबरच तिच्यासोबत ज्यावेळेस ही घटना घडत होती. त्या संपूर्ण घटनेचे ऑडीओ रेकॉर्डीग तिने तिच्या फोनमध्ये केले होते. म्हणजेच आरोपीने पीडीतेसोबत जे अश्लील संभाषण केले होते. ते संभाषण मोबाईलमध्ये कैद झाले होते. पोलिसांना हे रेकॉर्डीग ताब्यात घेऊन आरोपी धनंजय दुबे विरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी आरोपीचा धनंजय दुबेचा शोध सुरु केला होता.

हे ही वाचा : NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!

दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आरोपी मोबाईल स्विच ऑफ करून फरार झाला होता. यानंतर आरोपीने दुबेने त्या दिवशी मोबाईन चालू करून तुळींज पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षत शैलेंद्र नगरकर यांना व्हाट्सअ‍ॅप कॉल फोन करून थेट आव्हानच दिले होते. ‘डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है’, असा बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनचा डायलॉग मारून धनंजय दुबेने पोलिसांना अटक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. पोलिसांनी हे आव्हान स्विकारत लोकेशन ट्रेस करून नराधम आरोपी धनंजय दुबेला भायंदरच्या उत्तनमधून अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT