Crime: कपटी वहिनीचे अनैतिक संबंध… नवऱ्याला सांगून नणंदेची क्रूर हत्या!

ADVERTISEMENT

vicious sister in law illicit relations property horrifying truth of half burnt body of a girl found inside a suitcase
vicious sister in law illicit relations property horrifying truth of half burnt body of a girl found inside a suitcase
social share
google news

Crime News: उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये मागील आठवड्यात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मुलीचा मृतदेह सापडला होता. ज्याची आता ओळख पटली आहे. मनीषा असे मृत महिलेचे नाव असून ती नोएडातील सैदपूर गावातील रहिवासी आहे. मनीषाची हत्या तिच्या वहिनी आणि भावाने मिळून केली होती. या हत्येत वहिनीचा प्रियकरही सहभागी होता. सध्या मृत महिलेचा भाऊ आणि वहिनीला अटक करण्यात आली आहे. वहिनीचे प्रियकराशी अनैतिक संबंध आणि मनीषाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (vicious sister in law illicit relations property horrifying truth of half burnt body of a girl found inside a suitcase)

हे प्रकरण कोतवाली बागपत भागातील आहे. जिथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये एका मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. तसेच घटनेचा तपासही सुरू केला होता. दरम्यान, तपासात हा मृतदेह नोएडा येथील रहिवासी असलेल्या मनीषाचा असल्याचे समोर आले होते.

आता पोलिसांनी मनिषा खून प्रकरणाचे गूढ उकलले आहे. मनीषाचा भाऊ, वहिनी आणि वहिनाचा प्रियकर यांच्यावर खुनाचा आरोप आहे. सध्या प्रियकर फरार आहे तर भाऊ आणि वहिनीला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नणंदेचा खून का केला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषाची हत्या तिचा भाऊ मनीष त्याची पत्नी शिखा आणि शिखाचा प्रियकर पवन यांनी केली होती. वास्तविक, शिखा आणि पवनचे प्रेमप्रकरण अनेक वर्षांपासून सुरू होते. मनिषाला याची जाणीव होती. तिने याच गोष्टीला विरोध केला होता. पण काही केल्या वहिनी शिखा ही ऐकण्यास तयार नव्हती. तेव्हा मनीषाने तिचा भाऊ मनीष याला त्याच्या बायकोच्या अनैतिक संबंधाबाबत सांगितलं. यानंतर शिखाने मनीषाला तिच्या मार्गातून दूर करण्याचा एक अतिशय वेगळा प्लॅन केला.

हे ही वाचा>> Crime: डोंबिवलीत जावयाने सासूचं घरातून केलं अपहरण, रुमवर नेलं अन्…

मनीष आणि त्याची बहीण मनीषा हे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेत समान भागीदार होते. त्यामुळेच मनीष त्याच्या बहिणीच्या विरोधात होता. त्याला बहिणीला मालमत्तेत कोणताही हिस्सा द्यायचा नव्हता. त्यामुळेच पत्नी शिखाच्या बोलण्याने मनीष प्रभावित झाला. शिखाने पतीला तिची बहीण मनीषाविरुद्ध भडकवले आणि तिच्यावर खोटे आरोप केले.

ADVERTISEMENT

शिखाने तिच्या पती आणि प्रियकराला मनीषाच्या हत्येसाठी केलं प्रवृत्त

शिखाने पती मनीषच्या मनात बहिणीबाबत विष कालवल्यानंतर तो देखील आपल्या बहिणीचा खून करण्यासाठी तयार झाला. यानंतर शिखाने पतीसोबतच प्रियकर पवनला देखील या कटात सहभागी करून घेतलं.

ADVERTISEMENT

यानंतर संधी साधून तिघांनीही आधी मनीषाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून कारमधून बागपतच्या सिसाना गावात आणण्यात आला. जिथे निर्जन ठिकाणी सुटकेस पेटवून दिली. सकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांना मनीषाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

हे ही वाचा>> Crime: मेहुणीच्या प्रेमात झालेला वेडा, दाजीने केलं भलतंच काही..

पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना एखा कारचा माध्यमातून या खुनाचा उलगडा झाला. कारण घटनास्थळाजवळ एक संशयास्पद कार दिसली होती. सीसीटीव्ही आदींद्वारे तपास करून कारचा छडा लावला असता हा प्रकार उघडकीस आला. मृताच्या चुलत भावाने मनीषा बेपत्ता झाल्याची तक्रार नोएडातील सेक्टर-39 पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. ज्याआधारे हा तपास सुरू झाला होता. ज्यानंतर आता ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT