क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

video made of fellow student taking bath in bathroom
video made of fellow student taking bath in bathroom
social share
google news

Crime News:  बंगळुरू: कर्नाटकातील बंगळुरू येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आपल्याच बॅचच्या आणखी एका विद्यार्थिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ (Video) बनवल्याचा तिच्यावर आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आज आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर सेंटरकडूनही मुलीलाही निलंबित केले आहे. (video made of fellow student taking bath in bathroom police arrested accused girl)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 29 मार्च रोजी घडली होती. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Sports Coaching) करत आहे.

तिने पुढे सांगितले की, सरावानंतर ती कॅम्पसमधील बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलीने तिच्या मोबाइलमध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

हे वाचलं का?

अधिक वाचा- घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने या व्हिडीओबद्दल तिच्या सहकारी विद्यार्थिंनीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पळून गेली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने तातडीने केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

आरोपी विद्यार्थिनीवर अटक आणि निलंबनाची कारवाई

ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणी अधिक माहिती घेतली. यानंतर आज (31 मार्च) आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. यासोबतच तिला क्रीडा सेंटरमधूनही निलंबित करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

1984 मध्ये झालेली SAI ची स्थापना

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ची स्थापना 1984 मध्ये झाली होती. खेळांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता प्राप्त करणे या दुहेरी उद्देशाने SAI ची स्थापना करण्यात आली होती. साईची देशात 10 प्रादेशिक केंद्रे आहेत. जी कोलकाता, बंगलोर, गांधीनगर, भोपाळ, सोनीपत, चंदीगड, इंफाळ, लखनौ, गुवाहाटी, मुंबई येथे आहेत. याशिवाय साईची एक्सलन्स सेंटर्सही उघडण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका पतीने (Husband) आपल्याच पत्नीचे बेडरूमच्या सीसीटीव्हीत कैद झालेले प्रायव्हेट (Private Video) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घटनेनंतर महिलेची बदनामी झाली आहे. या प्रकरणी महिलेने आता पोलिस (police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा- 19 वर्षीय तरुणीने बनवले भावा-बहिणीचे अश्लील फोटो; कारण…

या घटनेतील आरोपी पतीचे वय 27 वर्ष आहे, तर पत्नीचे वय 25 वर्ष आहे. हे पती-पत्नी मछली मंडी परिसरात राहतात. दोघांचे दोन वर्षापुर्वीच लग्न झाले होते. या लग्नात मुलीकडच्यांनी मुलांना बुलेट बाईक दिली होती. या लग्नानंतर दोघांचा संसार खुप चांगला सुरु होता. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती. या वादाच कारण ठरली होती बुलेट बाईक.

खरं तर लग्नात नवऱ्याकडच्यांकडून लग्नात कारची मागणी करण्यात आली होती. मात्र कार देण्यास मुलीकडच्यांनी नकार दिला होता. यावरून दोघा पती-पत्नीमध्ये (Husband-wife) खुप वाद झाला. पतीने पत्नीला मारहाण देखील केली होती. या मारहाणीनंतर पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. माहेरी जाऊन पत्नीने पतीविरोधात घरगूती हिंसाचार प्रकरणी (Domestic Voilence Act 2005) तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीची चौकशी केली होती.

अधिक वाचा- ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?

पतीने (Husband) तक्रार मागे घेण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला होता. पण पत्नीने (Wife) ज्यावेळेस त्याला नकार दिला त्यावेळेस पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. मात्र पत्नीने तक्रार मागे न घेतल्याने त्याने पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. इतकेच नाही तर स्वताच्या व्हाट्सअप स्टेटसवर देखील ठेवले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT