Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 13 नागरिक जागीच ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

violence again in manipur 13 civilians killed in firing between two groups
violence again in manipur 13 civilians killed in firing between two groups
social share
google news

Manipur Firing : भारतातील ईशान्येकडील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार (violence) उफाळू आला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचारच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी दुपारी 2 गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जणांचा (13 Death) मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या हिंसाचाराविषयी माहिती देताना एका एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच सुरक्षा दल तिथे दाखल झाले. त्यावेली उसळलेल्या दंगलीमुळे ठार झालेले 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले. हिंसाचारामुळे झालेल्या मृतांजवळ कोणत्याही प्रकारची हत्यारं अथवा शस्त्रं सापडली नसून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. (violence again in manipur 13 civilians killed in firing between two groups)

ADVERTISEMENT

ठार झालेले नेमके कोण?

हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, ठार झालेले नागरिक हे स्थानिक असल्याचे दिसून येत नाहीत. हे कुठून तरी दुसरीकडून आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठार झालेल्या नागरिकांची ओळख अद्याप पटलेली नाही. 3 डिसेंबर रोजी तेंगनौपाल जिल्ह्यातील कुकी-जो आदिवासी गटांकडून भारत सरकार आणि यूएनएलईएफ यांच्यामध्ये झालेल्या शांतता कराराचे स्वागतही करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Rajasthan: ‘तात्काळ Non Veg चे ठेले बंद करा’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्याला फोन

निर्बंध वाढवले

गेल्या 7 महिन्यांनंतर रविवारीच राज्यातील मोबाईलच्या इंटरनेटवरील बंदी उठवण्यात आली होती. त्यानंतर लगेच ही घटना घडली आहे. त्यामुळे आता आणि काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध वाढवण्यात आले आहे. हा हिंसाचार आता पुन्हा का उफाळून आला त्याची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये आणखी काही नागरिक जखमी झाले आहेत का त्याचीही चौकशी केली जाणार आहे.

हे वाचलं का?

व्हिडीओ व्हायरल

सप्टेंबर महिन्यातील 23 रोजी इंटरनेटवरील बंदी काही काळासाठी उठवण्यात आली होती, परंतु भडकाऊ भाषण आणि वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर त्यानंतर काही दिवसापूर्वी ही बंदी उठवण्यात आली होती, मात्र ही घटना घडल्यामुळे आता पुन्हा एकदा निर्बंध वाढण्याची शक्यता सुरक्षा दलाकडून वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा >> Crime: उधारीमुळे कान गमावला, मित्राने तोडला कानाचा लचका!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT