'वाल्मिक कराडचा 'तो' मेसेज आणि सुदर्शन घुलेने दुसऱ्या दिवशी...', उज्वल निकमांचा युक्तिवाद जसाच्या तसा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ज्यामध्ये त्यांनी काही धक्कादायक गोष्टी कोर्टासमोर मांडल्या आहेत.
ADVERTISEMENT

बीड: बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज (26 मार्च) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे देखील हजर होते. त्यांनी आपल्या युक्तिवादात काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडले. दरम्यान, यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट कोर्टाला सांगितली.
विष्णू चाटे याने वाल्मिक कराडचा एक मेसेज सुदर्शन घुले याला दाखवला. ज्यामध्ये वाल्मिक कराड याने जो आडवा येईल त्याला कायमचा धडा शिकवा. असं म्हटलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली.
सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद करताना खंडणी प्रकरण, मारहाण प्रकरण आणि हत्या प्रकरण पूर्ण घटनाक्रम हा वेळ आणि तारीख यानुसार कोर्टाला माहिती दिली. तब्बल 32 मिनिटं त्यांनी आपला युक्तिवाद केला.
उज्वल निकम यांनी केलेला युक्तिवाद जसाच्या तसा..
आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे.. या कंपनीने मस्साजोग शिवारात 32 एकर जमिनीवर गोडाऊन केले. सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत.










