Mira Road Murder : सरस्वतीच्या हत्येनंतर मनोज साने गुगलवर काय सर्च करत होता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who is Manoj sane? : The police said that they found internet search history from Sanes phone, which is surprising. Manoj used eucalyptus oil to suppress the smell, so he bought five vials.
Who is Manoj sane? : The police said that they found internet search history from Sanes phone, which is surprising. Manoj used eucalyptus oil to suppress the smell, so he bought five vials.
social share
google news

Saraswati Vaidya Murder Case : मुंबई मीरा रोड भागात राहणाऱ्या मनोज सानेने त्याच्याच लिव्ह इन पार्टनरची (सरस्वती वैद्य) हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. 56 वर्षीय मनोज साने याने सरस्वतीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती. प्रकरण उघडकीस येईपर्यंत त्याने निम्म्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली होती. दरम्यान, पोलिसांकडून याचा तपास सुरू असून, सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोज मोबाईलवर काय सर्च करत होता याबद्दलची माहिती समोर आली आहे. (What is Mira Road murder case?)

ADVERTISEMENT

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, त्यासाठी पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांना मनोज सानेच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजने मृतदेहामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून काय करायला हवे, याची माहिती ऑनलाईन घेतली होती.

हेही वाचा >> Navi Mumbai Crime : दारू पार्टी भोवली, तरुणीचा जीवच गेला… अपघात की घातपात?

इतकंच नाही, तर साने यांच्या मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये इतरही बाबी सापडल्या आहेत, ज्या धक्कादायक आहेत. मृतदेहाचा वास बाहेर जाऊ नये म्हणून मनोजने निलगिरीचे तेल वापरले. निलगिरीच्या तेलाच्या त्याने पाच बॉटल खरेदी केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

पोलिसांनी या प्रकरणी 8-10 जणांचे जबाब नोंदवले आहे. साने याच्या फोनमधून सरस्वती वैद्यचा फोटोही सापडला असून, त्यात तिच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. या फोटोमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेनंतर परिसरातील लोक फिरायलाही घाबरत आहेत. आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी जाणवत असून, साफसफाईचे काम सुरू आहे.

हत्येच्या घटनेपासून परिसरात शुकशुकाट

हा गुन्हा उघड झाल्यापासून परिसरात सर्वत्र शुकशुकाट आहे. सोसायटीचे सचिव प्रताप अस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले की, “आताही येथील रहिवासी भीतीखाली आहेत आणि इकडे तिकडे जाण्यास घाबरत आहेत. परिसरात दुर्गंधी अजूनही येत आहे आणि आम्ही संपूर्ण परिसर स्वच्छ करत आहोत.” ते असंही म्हणाले की, “या घटनेतून धडा घेत सोसायटी व्यवस्थापनाने भाडेकरूंची सखोल पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.”

ADVERTISEMENT

प्लास्टिक पिशव्या आणि रक्ताचे डाग

पोलिसांनी सांगितले की, त्यांना एका खोलीत प्लास्टिकची पिशवी आणि रक्ताने माखलेले करवत सापडले, परंतु जेव्हा ते स्वयंपाकघरात गेले तेव्हा पोलीस चक्रावून गेले. किचनमध्ये पोलिसांना प्रेशर कुकरमध्ये उकळलेले मानवी मांस आणि महिलेचे केस जमिनीवर पडलेले आढळले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “ये डर अच्छा है”, अमित शाहांच्या भाषणावर संजय राऊत काय बोलले?

अर्धी जळालेली हाडे आणि मांसाचे तुकडे बादल्या आणि टबमध्ये होते. साने गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना चारत असल्याचे शेजाऱ्यांनी गुरुवारी पोलिसांना सांगितले होते. मीरा भाईंदर परिसरातील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह अनेक तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT