मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?
अतीक आणि अशरफ यांची हत्या जरी तीन मारेकऱ्यांनी केली असली तरीही ते तिघेही एका चौथ्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर हे काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
ADVERTISEMENT
Atiq Ashraf murder case: प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) गेल्या शनिवारी म्हणजेच 15 एप्रिल रोजी कॅमेरासमोर अशी घटना घडली ज्याने अवघा देशच हादरुन गेला. माफिया आणि माजी खासदार अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या गरड्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतीक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही हत्या करण्यात आली होती. यावेळी तीन शूटर्सने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच गोळ्या झाडून दोन्ही भावांची हत्या तर केलीच, शिवाय यूपी पोलिसांना देखील एक प्रकारे आव्हान दिले. पोलिसांच्या ताब्यात असतानाही अतीक अहमद आणि अशरफ यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्यावरुन काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. (when three shooters were shooting atiq and ashraf in prayagraj was there a fourth person present)
ADVERTISEMENT
महत्त्वाची बाब म्हणजे अतीक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांकडून पोलिसांना एकही मोबाइल फोन मिळालेला नाही. अशा स्थितीत तिन्ही मारेकऱ्यांनी मोबाइलशिवाय एकमेकांशी संपर्क कसा साधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या आरोपींकडून लाखोंचे विदेशी पिस्तूल सापडले, त्यांच्याकडे एकही फोन का नव्हता? असा सवालही सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच तीन मारेकऱ्यांपैकी एक लवलेश तिवारी हा सोशल मीडियावर तर चांगलाच सक्रिय होता. असे असतानाही त्याच्याकडे कोणताही मोबाइल सापडलेला नाही.
हँडलरही होता घटनास्थळी हजर?
दरम्यान, पोलीस सूत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर येत आहे. तीन आरोपींसोबत त्यांचा एक मदतनीस किंवा हँडलरही घटनास्थळी उपस्थित असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी आता प्रयागराज पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे स्कॅनिंग सुरू केले आहे.
हे वाचलं का?
अतीकची प्रकृती खालावल्याने पोलीस त्याला आरोग्य तपासणीसाठी घेऊन जात होते. पण आरोपींना याबाबतची नेमकी माहिती कशी मिळाली? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रयागराज येथील अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येतील तिन्ही आरोपींचा हस्तक म्हणून काम करणारा चौथा व्यक्ती कोण होता? अतीक आणि अशरफ यांचा मृत्यू झाला तेव्हा घटनास्थळी चौथा व्यक्ती उपस्थित असल्याचा संशयही आता व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
त्याच हँडलरचा इशारा मिळताच तिघांनी अतीक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली होती असंही म्हटलं जात आहे. योजनेनुसार तिन्ही आरोपींना मोबाइल देण्यात आले नसल्याचे समजते. हँडलरच्या इशाऱ्यावरच तिघेही एकत्र आले होते आणि त्यानंतरच त्यांनी अतिकची हत्या केली. आता या चौथ्या व्यक्तीच्या शोधात पोलीस असून ते तीनही मारेकऱ्यांची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT