वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरूंगात मारहाण करणारे 'ते' दोघं आहेत तरी कोण?
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करणारे महादेव गित्ते, अक्षय आठवले हे नेमके आहेत तरी कोण. जाणून घ्या त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी.
ADVERTISEMENT

योगेश काशिद, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली. तुरुंगातच या दोन्ही आरोपींना इतर दोन आरोपींनी मारहाण केल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते तर मकोका अंतर्गत अटकेता असलेला आरोपी अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करणारे दोन आरोपी कोण?
महादेव गित्ते हा परळीचा असून शशिकांत उर्फ बबन गित्ते यांचा तो भाऊ आहे. परळी मतदारसंघातील सरपंच बापू आंधळे यांची भर चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि शशिकांत उर्फ बबन गित्ते आहेत. यापैकी बबन गित्ते हा अद्यापही फरार असून महादेव गित्ते हा जिल्हा कारागृहामध्ये आहे.
हे ही वाचा>> वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत तुरुंगात काय घडलं? दोन टोळ्या भिडल्याच्या माहितीनंतर खळबळ
गित्ते गँग आणि कराड यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय वाद आहे. परळी मतदारसंघांमध्ये या दोन्ही अनेकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं आहे.
नेमका कोण आहे अक्षय आठवले?
अक्षय आठवले हा सनी आठवलेचा भाऊ असून बीड शहरामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मकोका अंतर्गत झालेल्या कारवाईमध्ये आठवले गँगवर कारवाई करण्यात आली होती.










