Sukhdev Singh Gogamedi यांच्या हत्येतील आरोपी रोहित गोदरा आहे तरी कोण?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

who is rohit godara accused in the murder of sukhdev singh gogamedi what is connection with lawrence bishnoi
who is rohit godara accused in the murder of sukhdev singh gogamedi what is connection with lawrence bishnoi
social share
google news

Who is Rohit Godara: मुंबई: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (RRKS) अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi Murder) यांच्या हत्येनंतर एका नावाची चर्चा होत आहे. ते नाव म्हणजे रोहित गोदारा. राजस्थानचा कुख्यात गुंड… रिपोर्ट्सनुसार, त्याने स्वतः फेसबुकवर पोस्ट लिहून सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली असून अनेक मोठे दावे केले आहेत. सुखदेव गोगामेडी यांनी गोदारा शत्रूंना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी काम केल्याचा आरोप रोहित गोदाराने केला आहे. रोहित गोदाराने आपल्या इतर शत्रूंनाही यावेळी धमकी दिली आहे. (who is rohit godara accused in the murder of sukhdev singh gogamedi what is connection with lawrence bishnoi)

कोण आहे रोहित गोदारा?

गँगस्टर रोहित गोदाराचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले जात असल्याचे सांगितले जात आहे. आज तकचे प्रतिनिधी अरविंद ओझा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी गोदाराने त्याच्या दुबईतील फोनवरून गोगामेडी यांना धमकीही दिली होती. सध्या गोदारा हा भारतातून फरार आहे.

सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेत गोदाराने शेअर केली फेसबुक पोस्ट

‘सर्व भावांना राम राम. मी, रोहित गोदारा कपूरीसर, गोल्डी ब्रार, आज झालेल्या हत्येची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे. बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की तो आमच्या शत्रूंना सहकार्य करत होता. त्यांना बळ देण्याचे काम करत होता. जोपर्यंत आमच्या शत्रूंचा संबंध आहे, त्यांनी त्यांच्या घराच्या दारात त्यांची तिरडी तयार ठेवावी, आम्ही त्यांना लवकरच भेटू.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Gogamedi Murder: घरात घुसून 12 गोळ्या झाडल्या, निर्घृण हत्येचा हादरवून टाकणारा Video

13 वर्षांचा गुन्हेगारी इतिहास

रोहित गोदरा हा राजस्थानच्या बिकानेर येथील लुंकरण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर 32 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोदाराने 2010 साली गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. गोदाराने राजस्थानमधील व्यावसायिकांकडून 5 कोटी ते 17 कोटी रुपयांपर्यंत खंडणीचीही मागणी केली आहे. त्याच्यावर बिकानेर, चुरू, जयपूर आणि फलोदी येथे सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. रोहित बिकानेरमधील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. त्याने जुगल राठी यांना धमकावून खंडणी मागितली होती.

ADVERTISEMENT

ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने राठीच्या कारवर गोळीबार केला होता. पण यावेळी राठी यांच्याऐवजी त्यांचे नातेवाईक त्या गाडीतून प्रवास करत होते. याच प्रकरणी बिकानेर पोलिसांनी रोहितला अटक केली होती. त्यावेळी त्याला चुरू कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर बिकानेरला आणलं होतं. गोदारा हा 2019 पासून एका खुनाच्या गुन्ह्यात चुरू येथे तुरुंगात होता. त्याला 2022 मध्ये जामीन मिळाला होता. पण मे महिन्यात तो बिकानेरच्या जयपूर-जोधपूर बायपासवरून पळून गेला होता.

ADVERTISEMENT

गुंड राजू ठेहटच्या हत्येचा आरोप

2022 मध्ये राजस्थानमधील सीकरमध्ये गँगस्टर राजू ठेहटची हत्या करण्यात आली होती. या हत्येची रोहित गोदाराने जबाबदारी घेतली होती. तशीच जबाबदारी ही आता देखील घेण्यात आली आहे. तेव्हा रोहित गोदारा म्हणाला होता की, राजूची हत्या करून आनंदपाल सिंह आणि बलबीर बानुदा यांच्या मृत्यूचा बदला घेण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Gogamedi Murder: गोळ्या घालून केली चाळण, कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी?

गोदाराने हरियाणातील भिवानी येथील नवीन बॉक्सर टोळीशी संपर्क साधला होता. यावेळी टोळीचे शार्प शूटर हे विद्यार्थी बनून सीकर येथे आले होते आणि त्यांनी महिनाभर राजू ठेहटची रेकी केली होती आणि त्यानंतर त्यांनी ही हत्या केली होती.

मूसेवाला खून प्रकरणात नाव

सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही गोदाराचे नाव पुढे आले होते. पंजाबमधील मूसेवाला यांच्या हत्येसाठी वाहन पुरवल्याच्या आरोपावरून महेंद्र सहारनचे नाव पुढे आले होते. याच महेंद्र सहारनचा निकटवर्तीय म्हणून रोहित गोदारा याची ओळख होती.

रोहित गोदारा, लॉरेन्स विश्नोई हे गोल्डी ब्रार टोळीसाठी काम करतात. 13 जून 2022 रोजी गोदारा दिल्लीतून फरार झाला होता. त्यानंतर बनावट पासपोर्टवर तो दिल्लीहून दुबईला पळून गेला होता. बनावट पासपोर्टवर त्याने आपले नाव ‘पवन कुमार’ असे लिहिले होते. इंटरपोलने गोदाराविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोदारा सध्या कॅनडामध्ये असू शकतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT