Atiq Ahmed : अतिक, अशरफच्या हत्येमागे नक्की कोण? आरोपी अन् 15 प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

why killed atiq ashraf sit will interrogate the shooters pratapgadh jail
why killed atiq ashraf sit will interrogate the shooters pratapgadh jail
social share
google news

SIT Interrogate the shooters Today : उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmad)यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 3 आरोपींना आता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता एसआयटी (SIT) या आरोपींची चौकशी करणार आहे. अतिक-अशरफला का मारलं? या संपूर्ण घटनेमाग कोण आहे? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार एसआयटी या आरोपींवर करणार आहे. या चौकशीतून आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (why killed atiq ashraf sit will interrogate the shooters pratapgadh jail)

आरोपींना ‘हे’ प्रश्न विचारणार?

  1. अतिक-अशरफला का मारलं?
  2. या संपूर्ण हत्याकांडामागे कोणाचा हात आहे?
  3. हत्येसाठी शस्त्रे कुठून मिळाली?
  4. हत्येसाठी फंडिंग कुठून मिळाली?
  5. घटनाक्रमाची प्लानिंग कसी केली?
  6. दुहेरी हत्याकांडात कोणाचा-कोणाचा समावेश आहे?
  7. सुपारी घेऊन हत्या केलीत का?
  8. तुम्ही तिघे एकमेकांना कसे भेटलात?
  9. तुम्ही तिघेही एकमेकांना ओळखता का?
  10. ज्या बाईकवरून आलेलात ती बाईक कुठून मिळाली?
  11. मीडियाचे आयकार्ड आणि कॅमेरा कुठून मिळाला?
  12. मोबाईल विना तिघे एकत्र कसे आलात?
  13. दुहेरी हत्याकांड करून पळालात का नाही?
  14. फक्त माफिया बनण्यासाठी हत्या केलीत का?
  15. तुम्ही यापुर्वी कोणत्याही माफियासाठी काम केले आहे का?

 

हे ही वाचा : डोक्यात गोळी लागण्यापूर्वी अतिकने नाव घेतलेला गुड्डू मुस्लिम कोण?

अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि अशरफची (Ashraf Ahmad) हत्या करणारे आरोपी अरूण मोर्या, सनी आणि लवलेश तिवारी यांनी एसआयटी हे 15 प्रश्न विचारणार आहेत. या चौकशीतून काय धागे दोरे समोर येतात का? हे पाहावे लागेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहेत ‘हे’ शुटर?

अतिक हत्याकांडात (Atiq Ahmad) सहभागी असलेला सनी हा हमीरपूरचा आहे. अरूण उर्फ कालिया कासगंजचा आहे, तर लवलेश तिवारी हा बांदा जिल्ह्याचा रहिवाशी आहे. लवलेश विरोधात पोलीस ठाण्यात 4 केस दाखल आहेत. तर मुलीला कानाखाली मारल्याप्रकरणी तो जेलमध्येही जाऊन आलाय. तर सनी हा कुरार पोलिस ठाण्यात हिस्ट्रीशीटर आहे. त्याचा हिस्ट्रीशीट नंबर 281A आहे. त्याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत. अरूणने जीआरपीच्या ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसाची हत्या केली होती.या हत्येनंतर तो फरार झाला होता.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि अशरफ पोलीस रात्रीच्या सुमारास मेडिकला घेऊन जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पत्रकार बनून आलेल्या अरूण मोर्या, सनी आणि लवलेश तिवारी या तिघांनी गोळ्या झाडून दोघांची हत्या केली. या घटनेत आरोपींनी 18 राऊंड फायरिंग केली होती, यामधील 8 गोळ्या अतिकला लागल्या होत्या. अतिक-अश्रफचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी अरूण मोर्या, सनी आणि लवलेश तिवारी यांनी सरेंडर केले होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अतिक अहमदची ‘अफाट’ संपत्ती… आता कोण असणार वारसदार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT