शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Wife got Pregnant by Neighbor husband killed haryana hisar case
Wife got Pregnant by Neighbor husband killed haryana hisar case
social share
google news

Wife got Pregnant by Neighbor husband killed :देशभरात अनैंतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्यांच्या घटना देखील वाढल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या बायको प्रियकरापासून गर्भवती राहिली होती. त्यामुळे बायको आधीच सोडून गेली त्यात ती गर्भवती देखील राहिली होती. त्यामुळे नवरा संतापला होता. या घटनेमुळे संतापून पतीने गर्भवती पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनाक्रमामुळे शहर हादरलं आहे. (Wife got pregnant by neighbor in live in relationship husband killed haryana hisar case)

घटनाक्रम काय?

हिसारच्या लांधडी गावात रोशनलाल याचे कुटुंब राहते. 2013 साली रोशनलालचे राजबाला सोबत लग्न झाले होते. या लग्नापासून त्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे. या दरम्यान राजबालाचे शेजारीच राहणाऱ्या अशोकशी प्रेम प्रसंग जुळले होते. गेली अनेक वर्ष ते दोघेही अनैंतिक संबंधात होते. या दरम्यानच ऐके दिवशी राजबाला तिच्या प्रियकर अशोकसोबत फरार झाली होती. या घटनेनंतर गावच्या पंचायतीत हे प्रकरण गेले. राजबालाला तिच्या पतीसोबत राहिले पाहिजे. तलाक न घेता ती प्रियकरासोबत राहू शतक नाही, असे पंचायतीत स्पष्ट करण्यात आले. मात्र पंचायतीचा आदेश राजबाबाने मानला नाही.

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

राजबाला 10 महिन्यापुर्वीच तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. यावेळी तिने तिच्या लहान मुलाला आजोबांच्या घरी ठेवले होते. आणि ती प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पती रोशनलाल या घटनेने आधीच संतापला होता.त्यात आता त्याची बायको गर्भवती असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे तो आणखीणच वैतागला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असा रचला हत्येचा कट

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना राजबाला गर्भवती राहिली होती.त्यामुळे राजबाला रूटीन चेकअपसाठी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जायची. अशीच 3 मे ला तिची तारीख होती. त्यामुळे राजबाला आणखीण एका महिलेसह चेकअपसाठी आली होती. चेकअप झाल्यानंतर हेल्थ सेंटरच्या बाहेर पडताच तिच्या समोर पती रोशनलाल उभा होता. यावेळी रोशनलालने राजबालावर चाकूने 9 वेळा वार करून तिची हत्या केली. विशेष म्हणजे तिचा मृ्त्यू होईपर्यत तो घटनास्थळी उभा होता. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तो निघून गेला होता. पण नंतर तो घटनास्थळी तो पुन्हा आला आणि त्याने दहाव्यांदा चाकू मारला.

या घटनेनंतर रोशनलाल मित्राच्या गाडीवर बसून फरार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करत आरोपी रोशनलाल ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये ही घटना घडलीय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT