Crime: पत्नीचा सेक्सला नकार, निर्दयी नवऱ्याने थेट…

मुंबई तक

ADVERTISEMENT

wife refused have physical relations husband attacked her knife husband absconded
wife refused have physical relations husband attacked her knife husband absconded
social share
google news

Crime News: दिल्लीजवळ असलेल्या ओल्ड फरिदाबादमध्ये (Old Faridabad) लैंगिक (physical relations) संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीवरील हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे.चाकूने हल्ला केल्याने पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही तिला त्याच अवस्थेत सोडून त्याने पळ काढला आहे. महिलेचा नवरा पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन असून दारुच्या नशेत तो तिच्यावर अनेकदा अत्याचार (torture) करत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन ती नवऱ्यापासून विभक्त राहत होती.

ADVERTISEMENT

पत्नी रक्ताच्या थारोळ्यात

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नवऱ्याने बायकोवर चाकूने हल्ला करण्यात आल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मात्र त्यांच्या वादामुळे शेजाऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी नवऱ्याने तिच्यावर हल्ला करून तो पळून गेला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी जखमी झालेल्या महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमी महिलेवर उपचार सुरू असून पोलीस तिच्या नवऱ्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा >> पैसे थकले, दिली धमकी; महिलेची Ind-Pak सामन्याच्या तिकीटांच्या नावाने लाखोंची फसवणूक!

घटस्फोटाचाही वाद आला उफाळून

पोलिसांनी सांगितले की, 32 वर्षाच्या पीडित महिलेचा 2011 मध्ये बुलंदशहरातील राजवीर सिंह बरोबर लग्न झाले होते. त्यानंतर ती दोघं ओल्ड फरिदाबादमध्ये भाडोत्री घरात राहत होते. पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे की, चार वर्षापूर्वी राजवीरने दारुच्या नशेत त्याने आपल्या पत्नीला प्रचंड मारहाण केली होती. त्यामध्ये त्या गंभीर जखमीही झाली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असून रणवीर आपल्या मुलांना भेटण्यासाठी म्हणून तो घरी येत होता. आताही तो आपल्या मुलांना भेटण्यासाठी म्हणून आला होता.

हे वाचलं का?

महिलेवर केले सपासप वार

राजवीर सिंह शनिवारी पुन्हा तो महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने तिला घटस्फोटा अर्ज मागे घेण्यास सांगून आपण दोघं पुन्हा एकत्र राहणार असल्याचे तू न्यायालयात सांगण्याची तिला तो धमकी देऊ लागला. त्यानंतर त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली, त्यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला. त्या वादातूनच त्याने महिलेच्या पोटावर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी असून हल्लेखोर पसार झाला आहे.

हे ही वाचा >> Deepak Kesarkar :’…तर तुम्हाला अपात्र करेन’, मंत्री केसरकर भावी शिक्षिकेवर का भडकले?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT