मुलगी ठेवायची शारीरिक संबंध, बाप करायचा ब्लॅकमेल! पण ‘ती’ भयंकर घटना अन्…

मुंबई तक

बस्ती हनीट्रॅप प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर कथित ब्लॅकमेलिंग नेटवर्कचा उलगडा झाला आहे. महिला, तिचे वडील आणि वकिलाला अटक या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

woman honey trap father blackmailing case police officer end his life arrest up crime
महिलेला पोलिसांनी केली अटक
Google CTA

बस्ती, उत्तर प्रदेश: पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर कथित हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या नेटवर्कच्या अत्यंत धक्कादायक 
गोष्टी या समोर आल्या आहेत. पोलिसांच्या दाव्यानुसार, एका महिलेकडून लोकांशी जवळीक वाढवून त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ मिळवले जात होते. त्यानंतर या सामग्रीचा वापर करून पैशांची मागणी आणि बदनामीची धमकी दिली जात होती. या प्रकरणात महिला, तिचे वडील आणि एका वकिलाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर तपासाला वेग

हे प्रकरण बस्तीच्या वाल्टरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सूर्य प्रकाश सिंह यांच्या आत्महत्येनंतर समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी 29 ऑगस्ट रोजी आपल्या सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली होती. या घटनेच्या तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यातून कथित हनीट्रॅप नेटवर्कची माहिती समोर आली. 

मृत अधिकाऱ्याच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर 5 सप्टेंबर रोजी बस्ती कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली.