Crime : क्रूरतेचा कळस! महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहासोबत ठेवले…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

देशात हत्येच्या दररोज अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनेत हत्येच्याही पलिकडे जाऊन क्रूरतेचा कळस गाठल्याची घटना घडली आहे. एका 45 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता 120 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध लावला आहे. आरोपी हा महिलेचा ओळखीचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे. (women killed and rape with her dead body shocking crime story udaypur rajasthan)

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन हद्दीत 8 नोव्हेंबरला महिलेचा मृतदेह सापडला होता. 45 वर्षाच्या कालीबाई शेळ्या चरण्यासाठी 8 नोव्हेंबरला घराबाहेर पडल्या होत्या, मात्र संध्याकाळ होऊन सुद्धा त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे काळजीपोटी मुलाने आई कालीबाईचा शोध सूरू केला. मात्र आई काही त्याला सापडली नाही. त्यानंतर एका व्यक्तीने मुलाला आईचा मृतदेह चर्चमागे असल्याची माहिती दिली होती.

हे ही वाचा : NCP : शरद पवारांची अचानक प्रकृती खालावली! डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

मुलाने तत्काळ फिलाडेल्फिया चर्च गाठलं, तिकडे पेंटिक हॉस्टेलच्या मेनेजरीजवळ आईचा मृतदेह पडला होता. यावेळी कालीबाईच्या कपाळावर जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर मुलाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृत महिलेच्या मुलाने आईच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सूरू केला होता. मुलाचा आईच्या हत्याप्रकरणात कुणावरचं संशय नव्हता. त्यासोबत त्याचा कोणाशीही वादही नव्हता. त्यामुळे पोलिसांना या हत्याप्रकरणाचं गुढ उकलण्याचे मोठं आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सुमारे 120 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर त्यांना एका व्यक्तीवर संशय आला. या व्यक्तीचे नाव हेमल असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : Mumbra : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा, उद्धव ठाकरे स्वतः उतरले रस्त्यावर

उदयपूरचे एसपी भुवन भूषण यादव यांनी दिलेल्या माहितीनूसार, पतीच्या निधनानंतर कालीबाई आपल्या मुलासोबत मल्ला तलाई भागात राहत होती. यादरम्यान त्यांची हेमल नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. दोघेही एकमेकांना साधारण दोन वर्षांपासून ओळखत होते. अशाच ओळखीमुळे घटनेच्या दिवशी हेमल कालीबाईंना भेटली. हेमलने कालीला त्यांच्या नातेवाईकाच्या घरी येण्याचा आग्रह केला होता. परंतु कालीने यास नकार दिला. याचा राग मनात धरून हेमलने लाकडाचा एक जड तुकडा उचलून कालीच्या डोक्यात घातला आणि तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की कालीच्या मृत्यूनंतर आरोपी हेमलने तिच्या मृतदेहावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर घटनास्थळावरून त्याने पळ काढला होता. तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हेमल सतत आपले ठिकाण बदलत होता. यावेळी पोलिसांनी या घटनेत 120 सीसीटीव्ही फुटेज तपासून हेमलला अटक केली. हेमलला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT