Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी घेतले ताब्यात, कारण...

मुंबई तक

Worli Hit And Run Case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातही कायद्याचे पालन केले जाईल.

ADVERTISEMENT

पोलिसांनी मिहीर शाहच्या गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतले आहे.
worli hit and run case mihir shah girlfriend was detained police rajesh shah father and driver inquiry mumbai police
social share
google news

Worli Hit And Run Case Update : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याचे वडील आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांना आणि ड्रायव्हर राजर्षि बिदावत याला ताब्यात घेतले आहे. या दोघांनंतर आता पोलिसांनी मिहीर शाहच्या (Mihir Shah) गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांनी गर्लफ्रेंडला ताब्यात घेण्यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (worli hit and run case  mihir shah girlfriend wad detained police rajesh shah father and driver inquiry mumbai police) 

खरं तर ज्यावेळेस वरळी हिट अँड रन प्रकरण घडलं. या घटनेनंतर आरोपी मिहीर शाहने घटनास्थळावरून पळ काढला होता.या दरम्यान तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेल्याची देखील सुत्रांकडून माहिती मिळत आहे. गर्लफ्रेंडच्या घरी काही तास घालावल्यानंतर तो तेथून निघाला होता. यावेळी त्याने त्याचा फोन देखील स्विचऑफ केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी चौकशीसाठी मिहीरच्या गर्लफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. या चौकशीतून आता काय उलगडा होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?

दरम्यान अपघाताच्या वेळी कारमध्ये दोन जण होते. गाडी कोण चालवत होती, याचा तपास करत आहोत. सध्या राजर्षि आणि राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता का? या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. अपघातानंतर आरोपी कार कलानगरमध्ये सोडून निघून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याची कलमे जोडली आहेत, अशी माहिती डीसीपी झोन कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातही कायद्याचे पालन केले जाईल. अपघातात सहभागी असलेली व्यक्ती शिवसेनेच्या एका नेत्याचा मुलगा आहे का, असे विचारले असता, शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून सरकार प्रत्येक प्रकरणाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते.या अपघातासाठी वेगळे नियम असणार नाहीत. कायद्यानुसार सर्व काही केले जाईल. पोलीस कोणालाही वाचवणार नाहीत.  मुंबईतील दुर्घटना दुर्दैवी असून, मी पोलिसांना कठोर कारवाई करण्यास सांगितल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp