Kaushal Kishore : केंद्रीय मंत्र्याचे घर, मुलाचे पिस्तूल, मित्राचा मृत्यू कसा; Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Union Minister Kaushal Kishores news : Vinay Srivastava died due to bullet injury. Vinay is a friend of Minister Kaushal Kishore's son Vikash Kishore.
Union Minister Kaushal Kishores news : Vinay Srivastava died due to bullet injury. Vinay is a friend of Minister Kaushal Kishore's son Vikash Kishore.
social share
google news

kaushal kishore news marathi : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची कसून चौकशी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सध्या तरी तपास सुरू आहे. पण व्हीआयपी परिसरात मंत्र्यांच्या घरी घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरे आता अधिकाऱ्यांना शोधावी लागणार आहेत.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, विनय श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव असून, गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. विनय हा मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून विकासचे परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे.

हत्या की आत्महत्या…?

मात्र, हे पिस्तूल मृतापर्यंत कसे पोहोचले, त्याने गोळी झाडली की दुसऱ्या कुणी गोळी चालवली, तिथे कुणी बाहेरचा व्यक्ती आला होता का आणि ही हत्या की आत्महत्या…? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारादरम्यान विनयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस घटनास्थळी हजर असून तपासात गुंतले आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कुटुंबातील सदस्यांचे आरोप

घरातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप मृत विनयच्या नातेवाईकांनी केला आहे. विनयचे कपडेही फाटले होते. त्याचे घड्याळ वरच्या भांड्यात सापडले. त्याच्या डोक्याजवळ गोळी लागली होती. स्निफर श्वानांना तपासासाठी वरच्या मजल्यावर जाण्यास परवानगी नव्हती, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्र्याने काय म्हटलंय?

याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि मोहनलाल गंज येथील भाजप खासदार कौशल किशोर यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा घरी नव्हता. ते म्हणाले की, ‘मला घटनेची माहिती मिळाली आहे. पोलीस आयुक्तांशी बोलून घटनेची माहिती घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत आहोत. विकास किशोर घटनास्थळी नव्हता. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याचाही तपास पोलीस करत आहेत.’

ADVERTISEMENT

घटनास्थळावरून पिस्तूल मिळाल्याच्या प्रश्नावर मंत्री कौशल किशोर म्हणाले की, ‘मुलगा (विकास किशोर) विमानाने दिल्लीला निघाला असल्याने पिस्तूल घरीच ठेवले होते. उड्डाणात पिस्तुल नेता येत नाही. पिस्तूलची वैधता उत्तर प्रदेशातच आहे, त्यामुळे ती दिल्लीला नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता ती पिस्तुल त्याच्या मित्रांपर्यंत कशी पोहोचली याचा तपास पोलीस करत आहेत.’

ADVERTISEMENT

कौशल किशोरने असेही सांगितले की, मुलाचे मित्र घरी येत-जात राहतात, कालही आले होते. घटनेनंतरही तो तिथेच थांबले आणि पळून गेले नाही. तिथून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी सोबत नेले आहे.

दरम्यान, मंत्र्याचा मुलगा विकासचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तो फ्लाइटमध्ये बसलेला दिसत आहे. विकासच्या फ्लाइट तिकिटात 31 ऑगस्ट ही तारीख लिहिली आहे, ही तीच तारीख आहे ज्या दिवशी ही घटना घडली.

पोलिसांनी काय सांगितले?

डीसीपी राहुल राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय श्रीवास्तव याचा मृत्यू गोळी लागल्याने झाला. त्याच्या डोक्यावरही जखमेच्या खुणा आहेत. रात्री 6 जण घरात आले. खाणेपिणे केले आणि त्यानंतर गोळी लागल्याने विनयचा मृत्यू झाला. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. सीसीटीव्हीचेही स्कॅनिंग केले जात आहे. नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अजय रावत, शमीम बाबा आणि अंकित वर्मा या तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण मृतकासोबत एकाच घरात उपस्थित होते. रात्री सगळ्यांनी पार्टी वगैरे केल्याचे सांगितले जात आहे आणि नंतर ही घटना घडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT