kandivali murder : आला अन् तरुणाला घातली गोळी, कांदिवलीत भरदिवसा थरार
कांदिवली पश्चिम परिसरात तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपी फरार असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबईला लागून असलेल्या कांदिवली पश्चिम भागात एका घटनेनं खळबळ उडाली आहे. वर्दळ असलेल्या रस्त्यावर एका 30 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली. सकाळी 7.51 वाजता गणेश नगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास कांदिवली पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
ज्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली, त्याचं नाव मनोज लालचंद चौहान असं आहे. त्याच वय 30 वर्ष असून, तो कास्टिंग इमिटेशनचं काम करायचा.
गोळी झाडतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा नकार
कांदिवली पश्चिममधील गणेश नगर भागात रविवारी (28 मे) सकाळी 7.51 वाजता मनोज चौहान यांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळ्या झाल्यानंतर तरुण रस्त्यावर खाली पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
हेही वाचा >> बच्चू कडू-राणा दाम्पत्यात संघर्ष पेटला, लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गोळीबार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात गोळी झाडताना आरोपी दिसत आहे. तसेच गोळी लागल्यानंतर तरुण खाली पडताना दिसत आहे.