Elvish Yadav Arrested : युट्यूबर एल्विश अडकला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Elvish Yadav arrested in smuggling of snake venom case : युट्यूबर एल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एल्विश यादवला पोलिसांनी केली अटक

सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणात कारवाई

आतापर्यंत सहा जणांना पोलिसांकडून अटक
Elvish Yadav Latest News : सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली आहे. गेल्या महिन्यांपासून पोलीस त्याची सतत चौकशी करत होते.
एल्विश यादवला का झाली अटक?
एल्विश यादव पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. सापाच्या विषाप्रकरणी नोएडा पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. युट्युबर एल्विशवर पार्टीमध्ये सापाचे विष वापरल्याचा आरोप आहे.
काय प्रकरण आहे?
8 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. युट्युबर एल्विश यादव हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामध्ये राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. पोलिसांना राहुलच्या नावावर 20 मिली विष आढळून आले.
एल्विशने काय मांडलेली आहे भूमिका?
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एल्विशने इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याचे स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता, मी सकाळी उठलो. मी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पाहिल्या. मला अटक करण्यात आली आहे. माझ्या विरुद्ध चाललेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे खोटं आहेत आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.