ठाकरे गटातील उपशहरप्रमुख विशाल कपलेंची हत्या, पोलिसांनी सांगितलं कारण

akola news : उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर करण्यात आला होता चाकू हल्ला
ठाकरे गटातील उपशहरप्रमुख विशाल कपलेंची हत्या, पोलिसांनी सांगितलं कारण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडलीये. कपले यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला करण्यात होता. अज्ञातांनी केलेल्या चाकू हल्ल्यात विशाल कपले गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर माहिती दिलीये.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विशाल कपलेंचा मृत्यू झाला आहे. जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोर ही घटना घडलीये. कपलेंच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती.

अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची रविवारी हत्या करण्यात आली. अकोला शहरातील जठार पेठ भागातील एका मेडिकलवर विशाल कपले सायंकाळच्या सुमारास बसलेले होते.

यावेळी तोंडाला कपडा बांधलेले दोन अज्ञात मारेकरी तिथे आले आणि त्यांनी विशाल कपलेंवर पाठीमागून हल्ला केला. पाठीमागून हल्ला झाल्यानंतर विशाल कपले उठून उभे राहिले. त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोरांना त्यांच्या छातीत धारदार चाकूने वार केला.

ठाकरे गटातील उपशहरप्रमुख विशाल कपलेंची हत्या, पोलिसांनी सांगितलं कारण
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याबद्दल अश्लील पोस्ट करणारा निघाला विद्यार्थी, पोलिसांनी कसा शोधला ठिकाणा?

या चाकू हल्ल्यात विशाल कपले गंभीर जखमी झाले. विशाल कपलेंवर वार केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने विशाल कपळेंना आयकॉन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं उपचारादरम्यान विशाल कपलेंचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल कपलेंवर जुन्या वादातून हल्ला झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले असून, हल्लेकरूंचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कपलेंवरील हल्ला शिवसेनेच्या गटबाजीतून ही घटना घडल्याचं म्हटलं जातं आहे.

ठाकरे गटातील उपशहरप्रमुख विशाल कपलेंची हत्या, पोलिसांनी सांगितलं कारण
Mumbai Crime : दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद, अल्पवयीन मुलांनी केली तरूणाची हत्या

मागील अनेक दिवसांपासून शिवसैनिक आणि विशाल कपलेंमध्ये अंतर्गत कलह होता. त्यातून हा हल्ला झाला, असावा असंही सांगण्यात येतंय. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in