Crime : पहिलं राखी बांधून घेतली पुन्हा तिच्यासोबतच केलं लग्न, नंतर केले हे कृत्य
Crime news : हरियाणातील सोनीपतमधील गुमाड गावात मावशीच्या घरून कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. विद्यार्थिनीच्या मावशीचा शेजारी सुनील उर्फ शीला याने तिला कॅनडाला गेल्याच्या 17 दिवसांनीच परत बोलावले. यानंतर त्यांचा आर्य समाज मंदिरात विवाह झाला. लग्नानंतर मुलगी परत कॅनडाला गेली. यानंतर एप्रिल 2022 मध्ये सुनीलने तिला पुन्हा फोन केला. दरम्यान, जून 2022 रोजी […]
ADVERTISEMENT

Crime news : हरियाणातील सोनीपतमधील गुमाड गावात मावशीच्या घरून कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. विद्यार्थिनीच्या मावशीचा शेजारी सुनील उर्फ शीला याने तिला कॅनडाला गेल्याच्या 17 दिवसांनीच परत बोलावले. यानंतर त्यांचा आर्य समाज मंदिरात विवाह झाला. लग्नानंतर मुलगी परत कॅनडाला गेली. यानंतर एप्रिल 2022 मध्ये सुनीलने तिला पुन्हा फोन केला. दरम्यान, जून 2022 रोजी वादानंतर सुनीलने गन्नौर येथील निर्जनस्थळी तिच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली होती. (Tied the first rakhi and married her again, then did this act)
मुंबईत भरदिवसा तीन जणांचा खून, 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांना संपवलं!
या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर भिवानी पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या डोक्यात गोळीचा काही भाग आढळून आला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. आरोपीला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन घटनेत वापरलेली कार आणि शस्त्र जप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मोनिकाच्या नातेवाईकांनी गन्नौर पोलिस स्टेशन आणि सोनीपत पोलिसांवर तैनात असलेल्या दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मोनिकाच्या हत्येत इतर अनेक लोकांचाही सहभाग असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मोनिका 2017 मध्ये तिच्या मावशीच्या घरी शिकण्यासाठी आली होती
मूळची, रोहतकच्या बलंद गावात राहणारी 22 वर्षीय मोनिका 2017 मध्ये गुमाड गावात तिची मावशी रोशनीकडे शिकण्यासाठी आली होती. ती दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करत होती आणि कॉम्प्युटर कोचिंगही करत होती. गुमड येथे वास्तव्यास असताना तिच्या मावशीच्या शेजारी सुनील उर्फ शीला याच्याशी ओळख झाली. सुनील हा मोनिकाच्या मावशीच्या घरी दूध घेण्यासाठी येत असे. सुनील विवाहित आहे. तो मोनिकाशी बोलू लागला. दरम्यान, 5 जानेवारी 2022 रोजी मोनिकाला कॅनडाला शिक्षणासाठी पाठवण्यात आले. ती बिझनेस मॅनेजमेंट शिकायला गेली. सुनीलने त्याला 22 जानेवारी 2022 रोजी परत बोलावले.