Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन गवळी जेलमधून कायमचा सुटणार? नेमकं ‘ते’ प्रकरण काय?

मुंबई तक

What exactly is kamlakar jamsandekar murder case नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) अरुण गुलाब गवळी (Arun Gawali) याने वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरून जेलमधून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. (underworld don arun gawli […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

What exactly is kamlakar jamsandekar murder case नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) अरुण गुलाब गवळी (Arun Gawali) याने वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरून जेलमधून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. (underworld don arun gawli moved high court for early release from jail what exactly is kamlakar jamsandekar murder case)

अरुण गवळी याने 14 वर्षे कारावासाची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे आता शिक्षा माफी मिळून आपली तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करावी अशी प्रार्थना त्याने केली आहे.

20 जानेवारी, 2006 च्या शासन अधिसूचनेनुसार 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आरोपी हा मुक्त होण्यास पात्र आहे. कारण त्याने वयाची 65 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत आणि तो वृद्धापकाळाने आजारी आहे. असा दावा अरुण गवळीच्या वतीने कोर्टात करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने अरुण गवळी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर संबंधित विभागाला आणि प्रशासनाला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अरुण गवळीच्या बाजूने वकील मीर नगमान अली यांनी न्यायालयात बाजू मांडत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp