क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

मुंबई तक

कर्नाटकातील बंगळुरू येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्यासोबतच्या एका मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी मुलीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

video made of fellow student taking bath in bathroom
video made of fellow student taking bath in bathroom
google news

Crime News:  बंगळुरू: कर्नाटकातील बंगळुरू येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आपल्याच बॅचच्या आणखी एका विद्यार्थिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ (Video) बनवल्याचा तिच्यावर आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आज आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर सेंटरकडूनही मुलीलाही निलंबित केले आहे. (video made of fellow student taking bath in bathroom police arrested accused girl)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 29 मार्च रोजी घडली होती. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Sports Coaching) करत आहे.

तिने पुढे सांगितले की, सरावानंतर ती कॅम्पसमधील बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलीने तिच्या मोबाइलमध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

अधिक वाचा- घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने या व्हिडीओबद्दल तिच्या सहकारी विद्यार्थिंनीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पळून गेली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने तातडीने केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

हे वाचलं का?